सप्तसुरांच्या मैफलीसोबतच अकोलेकरांनी घेतला ‘शॉपिंग फेस्टिव्हल’चा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:55 PM2020-02-24T13:55:07+5:302020-02-24T13:55:16+5:30

कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक श्रद्घेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

Akolekar has enjoyed the 'Shopping Festival' along with the seven-star concert | सप्तसुरांच्या मैफलीसोबतच अकोलेकरांनी घेतला ‘शॉपिंग फेस्टिव्हल’चा आनंद

सप्तसुरांच्या मैफलीसोबतच अकोलेकरांनी घेतला ‘शॉपिंग फेस्टिव्हल’चा आनंद

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मोरया मोरया, दिल है छोटासा...., दमा दम मस्त कलंदर ते झिगांटच्या तालावर मनसोक्त नृत्य तसेच सुरांमध्ये चिंब होत अकोलेकरांनी  लोकमत सखी आनंदोत्सवात लोकमत बाल विकास मंच व फुर्टाडोझ स्कूल आॅफ म्युझिकतर्फे आयोजित म्युझिकल कॉन्सर्टमध्ये एकच धूम केली. गेल्या शुक्रवारपासून आयोजित आनंदोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आयोजित कार्यक्रमाकरिता आ. गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मित्तल इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक श्रीराम मित्तल, वंदना मित्तल, ललित ट्युटोरियल्सचे ललित काळपांडे व दीप्ती काळपांडे, फुर्टाडोझ म्युझिक स्कूलचे व्होकल हेड डॉ. रेजी सुरेंद्रन व डस्टर हेड अंकित जैन हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक श्रद्घेय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर म्युझिकल कॉन्सर्टमध्ये सुप्रसिद्ध गायिका डॉ. रेजी सुरेंद्रन, सारेगम फेम ऐश्वर्या सहस्रबुद्धे, ताकधिनाधिन फेम आनंद जहागीरदार, व सूर नवा ध्यास नवा फेम राजकुमार निंबोकार या गायकांनी एकाहून एक सरस आणि धमाकेदार हिंदी मराठी गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत गाण्यांवर ताल धरायला लावला. सप्तसुरांच्या मैफलीसोबत शॉपिंग फेस्टिव्हलचे शेवटचे दोन दिवस शिल्लक.


शॉपिंग उत्सवाचे अंतिम दोन दिवस
 सकाळी ११ ते रात्री ९ वाजतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे आयोजित शॉपिंग उत्सवामध्ये ४० स्टॉल असून, यामध्ये विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने, गृह सजावट, इमिटेशन ज्वेलरी, ड्रेस मटेरियल, आॅटोमोबाइल यासह चटकदार पदार्थांचा फुड झोनदेखील अकोलेकरांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या पाच दिवसीय शॉपिंग फेस्टिव्हलचे अंतिम दोन दिवस बाकी आहेत. प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून, अकोलेकरांनी सहकुटुंब भेट द्यावी.


सोनरूपमतर्फे सखी मंच सदस्यांना पोहेहार
लोकमत शॉपिंग उत्सवामध्ये सखी मंच सदस्यांना सोनरूपमतर्फे पोहेहार मिळण्याचे अंतिम दोन शिल्लक असून, त्यासाठी सदस्यांनी सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० दरम्यान ओळखपत्र व सोनरूपमचे कूपन दाखविणे अनिवार्य आहे.


लोकमत सखी आनंदोत्सवात सखींचे एकत्रीकरण बघून महिला सक्षमीकरणाचे स्तुत्य काम लोकमत समूहातर्फे होत आहे. महिला सर्वच क्षेत्रात पुढाकार घेऊन देश निर्माणाकरिता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करीत आहेत. ‘लोकमत’चे राज्य स्तरावर तसेच अकोल्यातील उपक्रमांमुळे तळागाळातील कर्तृत्ववान व्यक्तींना व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होते.
-गोपीकिशन बाजोरिया, आमदार


लोकमत सखी मंचतर्फे महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यानुषंगाने विविध उपक्रम राबविले जात असतात. लोकमत आनंदोत्सवात महिलांना मनोरंजनासोबतच शॉपिंगचाही मनमुराद आनंद घेता येतो. अकोलेकरांसाठी लोकमत सखी आनंदोत्सव ही एक पर्वणीच आहे.
-जितेंद्र पापळकर,
जिल्हाधिकारी

Web Title: Akolekar has enjoyed the 'Shopping Festival' along with the seven-star concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.