अकोलेकरांना आवडतो ७७७; मात्र १ नंबरसाठी ३ लाख शुल्क !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:32+5:302021-07-01T04:14:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : महागड्या वाहनांना फॅन्सी नंबर घेऊन स्वत:चा एक वेगळा ब्रॅन्ड असल्याचे दाखविण्यासाठी एक, ७७, ७७७, ...

Akolekar likes 777; But 3 lakh fee for number 1! | अकोलेकरांना आवडतो ७७७; मात्र १ नंबरसाठी ३ लाख शुल्क !

अकोलेकरांना आवडतो ७७७; मात्र १ नंबरसाठी ३ लाख शुल्क !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : महागड्या वाहनांना फॅन्सी नंबर घेऊन स्वत:चा एक वेगळा ब्रॅन्ड असल्याचे दाखविण्यासाठी एक, ७७, ७७७, ४१४१, ११११ हे क्रमांक सुमारे तीन लाख रुपये शुल्क भरून घेण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या माध्यमातून आरटीओला वर्षाकाठी माेठे उत्पन्नही मिळत असल्याची माहिती समाेर आली आहे.

अकाेलेकर १, ११, १११, ११११ या क्रमांकांसाेबतच ७, ७७, ७७७ आणि ७७७७, ९९९, ९९९९, ४१४१ या क्रमांकांची जास्त मागणी करीत असल्याची माहिती आहे. हे क्रमांक मिळविण्यासाठी जास्त रक्कमही माेजण्यात येत असून काहींनी तर प्रत्येक सिरीजमधील एक क्रमांक त्याच्यासाठी कितीही रक्कम घेऊन बुक करण्याचेच ठरविले आहे. सात वर्षांपूर्वी फॅन्सी क्रमांकाचे दर तीनपटीने वाढविले हाेते. त्यामुळे १ क्रमांक घ्यायचा असल्यास आता तीन लाख रुपये शुल्क द्यावे लागत आहे. आता या नियमामध्ये आणखी बदल झाला असल्याने यासाठी तब्बल पाच लाख रुपये माेजावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आरटीओची कमाई

२०१९ - ५२ लाख

२०२० - ५४ लाख

या तीन नंबर्सना सर्वाधिक दर

७ - १,५०,०००

७७ - २,००,०००

७७७ - १,४०,०००

फॅन्सी नंबरसाठी मागणी माेठी असते. एक या क्रमांकासाठी तीन लाख रुपये शुल्क आहे, तर आता नवीन नियमानुसार ही किंमत पाच लाख रुपये हाेणार आहे. किंमत वाढली तरीही फॅन्सी नंबरचे शाैकिन क्रमांकाची मागणी करतातच.

- गोपाल वरोकार

सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकाेला

७, ७७, ७७७, ७७७७ या क्रमांकांना मागणी

आकड्यांची बेरीज सात हाेईल, अशा नंबरची माेठ्या प्रमाणात मागणी आहे. ७, ७७, ७७७ आणि ७७७७ या चार क्रमांकांसाेबतच २५००, ३४००, ४३००, ५२००, ६१०० या क्रमांकासही मागणी आहे. यासाेबतच १००१, १, अशा नंबरलाही ब्रॅन्ड म्हणून काही राजकीय पदाधिकारी वापरत आहेत.

Web Title: Akolekar likes 777; But 3 lakh fee for number 1!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.