सामाजिक एकतेसाठी धावले अकोलेकर!

By atul.jaiswal | Published: October 31, 2017 04:39 PM2017-10-31T16:39:01+5:302017-10-31T16:43:21+5:30

अकोला: भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येते. त्यानिमित्ताने मंगळवारी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगणावर सकाळी ७.३० वाजता करण्यात आले.

Akolekar ran for social unity! | सामाजिक एकतेसाठी धावले अकोलेकर!

सामाजिक एकतेसाठी धावले अकोलेकर!

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय एकता दौड ला उत्स्फुर्त प्रतिसाद खासदार, जिल्हाधिकाºयांनी दाखविली हिरवी झेंडी


या एकता दौडला हिरवी झेंडी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दाखविली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे ,पोलीस अधिक्षक राकेश कलासागर ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांनी भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार संजय धोत्रे म्हणाले की, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश अखंड राखण्यासाठी परिश्रम घेतले, त्यांच्या परिश्रमामुळे आपला देश अखंड आहे. देशाची सामाजिक एकता राखण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाची निरंतर आठवण म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसारकरण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले .
दौडच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, विविधतामधे एकता हा भारताचा मुलमंत्र आहे. वेगवेगळे धर्म, जात,भाषा,असुनसुध्दा या देशातील नागरिक एकत्र आहे, हिच आपली विशेषता आहे. आपल्या देशातील नागरिकांमध्ये कोणतीही गोष्ट सहन करण्याची शक्ती तसेच ऐकण्याची व जोपासण्याची क्षमता असल्यामुळे आपली एकता आबाधीत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगीतले.
वसंत देसाई येथुन सुरु झालेली दौड टॉवर चौक,जुने बसस्थानक मार्ग,फतेह चौक,संतोषी माता चौक परत वसंत देसाई स्टेडीयम येथे दौडचा समारोप झाला. या दौडमध्ये जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय ,पोलीस अधिक्षक राकेश कलासागर ,मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामुर्ती ,उपविभागीय अधिकारी संजय खडसे ,शिक्षणाधिकारी प्रकाश मुकंद ,शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर ,नेहरु युवा केन्द्राचे हरिहर जिराफे,उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) शेलार मॅडम,जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी सह विविध, शाळेचे विद्यार्थी, आय.एम. ए. चे डॉक्टर्स,खेळाडु यांनी सहभाग घेतला. संचालन क्रीडा अधिकारी देशपांडे , आभार प्रदर्शन समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.

Web Title: Akolekar ran for social unity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.