अकोलेकरांचा कल अल्युमिनियमकडून पुन्हा लोखंडी भांड्याकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:04 PM2017-11-30T12:04:07+5:302017-11-30T12:04:33+5:30

अकोला : अ‍ॅल्युमिनियम आणि प्लास्टिक चे भांडे अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरत असल्याचे वैद्यकीय अहवाल समोर येत असल्याने, आताची पिढी पुन्हा परंपरागत असलेल्या लोखंडी, पितळी, तांबे आणि कास्यांच्या भांड्याकडे वळू लागले आहेत.

Akolekar's aluminum to iron castle again! | अकोलेकरांचा कल अल्युमिनियमकडून पुन्हा लोखंडी भांड्याकडे!

अकोलेकरांचा कल अल्युमिनियमकडून पुन्हा लोखंडी भांड्याकडे!

googlenewsNext
ठळक मुद्देचित्तोडगडच्या पिढीजात लोहारांनी थाटला लोखंडी भांड्यांचा बाजार

लोकमत न्युज नेटवर्क
अकोला : अ‍ॅल्युमिनियम आणि प्लास्टिक चे भांडे अनेक रोगांना आमंत्रण देणारे ठरत असल्याचे वैद्यकीय अहवाल समोर येत असल्याने, आताची पिढी पुन्हा परंपरागत असलेल्या लोखंडी, पितळी, तांबे आणि कास्यांच्या भांड्याकडे वळू लागले आहेत. त्याचा प्रत्यय गत आठवड्याभरापासून अकोल्यात येतो आहे. चित्तोडगडचे पिढीजात लोहार गत आठवड्याभरापासून गोरक्षण मार्गावर लोखंडी भांडे विक्रीसाठी आले असून शहरात एवढे भांड्यांची दुकाने असताना अकोलेकर या दुकानांवर गर्दी करीत आहेत. दुकानांतील चमचमीत भांड्यापेक्षा लोकं या लोखंडी भांड्यांकडे वळत असल्याचे दिसत आहे.
  राजस्थान राज्यातील ऐतिहासिक चित्तोडगड येथील बारा कुटुंबीयांचे लोहार जातीचे बिºहाड गत काही दिवसांपासून अकोल्यात मुक्कामी आहे. गोरक्षण मार्गावरील सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयासमोरच्या दुतर्फा या मंडळीने आपले बिस्तान मांडले आहे. दिवसभर लोखंडी भांड्यांची विक्री करून येथेच मुक्काम करीत असताना ही मंडळी दिसत आहे. लोखंडी कडई, तावा, फोडणी देणारे खोलगट भांडे, खलबत्ता, चाळणी, घमेले, जुने शेरमाप, लोखंडी चूल, सांडशी, विळा, पावशी आदी संसारोपयोगी भांडे घेऊन ही मंडळी बसली आहे. विविध आकाराच्या आणि किमतीच्या या भांड्यांची खरेदी करणारे ग्राहक अकोल्यात मिळत असल्याने या मंडळीने अजूनतरी बिºहाड हलविण्याचा विचार केलेला नाही. बारा कुटुंबीयांच्या या बिºहाडात युवक, महिला, लहान मुलेदेखील आहेत. एकीकडे आपण काम नसल्याची ओरड करतो आणि दुसरीकडे वेगवेगळ््या प्रदेशातील उद्योजक मंडळी अकोल्यात येऊन रोजगाराच्या नवीन संधी काबीज करीत आहेत.

Web Title: Akolekar's aluminum to iron castle again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.