गेजपरिवर्तनाकडे अकोलेकरांचे लक्ष
By admin | Published: September 5, 2016 02:39 AM2016-09-05T02:39:27+5:302016-09-05T02:39:27+5:30
दक्षिण मध्यचे महाव्यवस्थापक करणार १२ सप्टेंबरला पाहणी.
अकोला, दि. ४: अकोला-आकोटदरम्यान मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनास प्रारंभ होणार होता; मात्र अद्याप याबाबत कुठल्याच हालचाली दिसत नसल्याने परत हा प्रश्न हवेतच विरला की काय, अशी शंका निर्माण निर्माण झाली आहे. तर याच संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक येत्या १२ सप्टेंबर रोजी अकोला दौर्यावर येत असल्याची माहिती सूत्रांनी ह्यलोकमतह्णला दिली.
केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या अर्थसंकल्पात दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला-खंडवा मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाकरिता विशेष निधी जाहीर केला होता. त्यानंतर लगेच अकोला-आकोटदरम्यानच्या कामास प्रारंभ होणार होता. रेल्वे प्रशासनाने मध्यंतरीच्या काळात या मार्गावर तीन मोठे रेल्वे पूल उभारणीसाठी निविदा प्रक्रियासुद्धा राबविली; मात्र आर्थिक वर्ष संपून दोन महिने अधिक उलटले असताना गेजपर्विनासाठीच्या कुठल्याच हालचाली दृश्य स्वरूपात सुरू झालेल्या दिसत नसल्याने हा प्रश्न परत रखडला की काय, अशी शंका अकोलेकरामध्ये निर्माण झाली आहे. तर याबाबतचा आढावा घेण्यासाठी येत्या १२ सप्टेंबला दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद येथील महाव्यवस्थापक रवींद्रनाथ गुप्ता हे अकोला दौर्यावर येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी ह्यलोकमतह्णला दिली.