अकोल्याचे यादव, माधवे, घुगे, ख्वाजा विजयी

By admin | Published: October 8, 2016 03:05 AM2016-10-08T03:05:05+5:302016-10-08T03:05:05+5:30

अमरावती विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा; १७ व १९ वर्षांआतील मुलांच्या गटातील लढती.

Akolya Yadav, Madhav, Ghuge, Khwaja won | अकोल्याचे यादव, माधवे, घुगे, ख्वाजा विजयी

अकोल्याचे यादव, माधवे, घुगे, ख्वाजा विजयी

Next

अकोला, दि. 0७- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित अमरावती विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन वसंत देसाई क्रीडांगण येथे केले आहे. मंगळवारी १७ व १९ वर्षांआतील मुलांच्या गटातील लढती घेण्यात आल्या. दोन्ही गटांत अकोला जिल्ह्यातील कुस्तीगीरांनी बाजी मारली.
अंतिम लढतीमध्ये १७ वर्षांआतील गटात ग्रीको रोमन प्रकारात ४२ किलो वजनगटात अमरावतीचा राजेश डाखोरे, ४६ किलो वजनगटात अकोल्याचा पंकज माधवे, ५0 किलो मो. फैज अमरावती, ५४ किलो वजनगटात आदित्य यादव अकोला, ५८ किलो वजनगटात विकास साबळे अमरावती, ६३ किलो वजनगटात वेदांत फाटे अमरावती, ६९ किलो वजनगटात गौरव घुगे अकोला, ७६ किलो वजनगटात आशिष पवार अकोला, ८५ किलो वजनगटात अमरावतीचा भूषण ठोके तसेच ९६ किलो वजनगटात बुलडाण्याचा आशुतोष पितळे याने विजय मिळविला.
१९ वर्षांआतील गटात ग्रीको रोमन प्रकारात ४२ कि लो वजनगटात अमरावतीचा श्रावण मुकाडे, ४६ किलो वजनगटात ज्ञानेश्‍वर सोनुने वाशिम, ५0 किलो वजनगटात अमरावतीचा सचिन तोडकर, ५५ किलो वजनगटात सौरभ घुरध्वज यवतमाळ, ६0 किलो वजनगटात अरविंद पिंजरकर वाशिम, ६६ किलो वजनगटात गुलाम ख्वाज अकोला, ७४ किलो वजनगटात गजानन बुरंगले बुलडाणा, ८४ किलो वजनगटात अकोल्याचा ऋषिकेश सटाले, १२0 किलो वजनगटात अमरावतीच्या विश्‍वजित निर्मळ याने लढत जिंकून राज्य स्तर स्पर्धेकरिता स्थान निश्‍चित केले.
स्पर्धेत पंच म्हणून राजेश चौधरी, अनिल कांबळे, दीपक मुदिराज, शिवा सिरसाट, कुणाल माधवे व विक्रांत धानोकार यांनी काम पाहिले. स्पर्धेचे संचालन आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव यांनी केले. स्पर्धेला राजेंद्र गोतमारे, आकाश इंगळे व बाळू धुर्वे आदी कुस्तीगीर उपस्थित होते.

Web Title: Akolya Yadav, Madhav, Ghuge, Khwaja won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.