अकोट : बंद कारमध्ये गुदमरून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:29 IST2019-06-05T11:28:22+5:302019-06-05T11:29:22+5:30
अकोटः अकोट तालुक्यातील देवरीफाटा नजीकच्या आलेवाडी येथे गाडीत गुदमरुन एका बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जुनच्या रात्री उघडकीस आली.

अकोट : बंद कारमध्ये गुदमरून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
- विजय शिंदे
अकोटःअकोट तालुक्यातील देवरीफाटा नजीकच्या आलेवाडी येथे गाडीत गुदमरुन एका बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जुनच्या रात्री उघडकीस आली. मृत्यू झालेला बालक हा कचरा प्लॅस्टिक पिशव्या वेचण्याकरीता आलेवाडीत आला होता.
दहीहांडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलेवाडी येथे काटेरी झुडपात एम एच ४३एन ९९११ क्रमांकाची ओपेरा चारचाकी गाडी उभी होती. या गाडीचा दरवाजा उघडून तानेश विष्णु बल्लाळ (अण्णाभाऊ साठे नगर अकोट फाईल अकोला) हा गाडीत बसला. गाडीचे दरवाजे आतमधुन बंद झाल्याने बालकाचा गूदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती आहे. हा बालक आपल्या आजी व मावशी सोबत प्लॅस्टिक कचरा वेचण्याकरीता आलेवाडी गावात आला होता. दुपारी खुपच ऊन्ह असल्याने या गाडीत तो बसण्याकरीता गेला असल्याचा तर्क काढण्यात येत आहे. गाडीचे मालक नागेश कराळे यांनी ही गाडी दोन वर्षापासून बंद अवस्थेत उभी असल्याचे पोलिसांना सांगितले. या घटनेची चौकशी व पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत