अकोट-अकोला मार्ग ठरतोय जीवघेणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:22 AM2021-08-28T04:22:55+5:302021-08-28T04:22:55+5:30
राज्य व राष्ट्रीय या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनाने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले होते. त्याकरिता कोट्यवधी रुपये ...
राज्य व राष्ट्रीय या महामार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी शासनाने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले होते. त्याकरिता कोट्यवधी रुपये शासनाने दिले. परंतु आधीच्या कंत्राटदार कंपनीने अर्धवट काम सोडून गाशा गुंडाळला. त्यानंतर सदर रस्त्याचे प्रकरणात न्यायालयात गेले होते. त्यानंतर नवीन कंपनीला या रस्त्याचे कंत्राट देण्यात आले. या कंपनीने कामाचा मुहूर्त काढला. परंतु कामाची गती वाढवली नाही. परिणाम पावसाळ्यात या रस्त्यावर वाहने चालविणे म्हणजे स्वर्ग गाठण्यागत परिस्थिती झाली. सध्याही हा रस्ता कमी-जास्त चढ-उतार असल्याने सतत अपघात घडत आहेत. कच्चा रस्त्यावर धूळ, चिखल व गिट्टी उखडली आहे. रस्त्याच्या कामाकडे कोणाचेही लक्ष नाहीच. या मार्गावर काम सुरू असताना शासनाचा कोणताही अभियंता, अधिकारी हजर नसल्याने रामभरोसे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. या कामाला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडत आहे. विविध पक्ष, संघटनेचे आंदोलने बेअसर ठरले आहेत.
रेफर अनेक रुग्णांचा मृत्यू
अकोट ग्रामीण रुग्णालयातून अनेक गंभीर रुग्णांना अकोला उपचारासाठी रेफर करण्यात येते. परंतु ४५ किमी रस्ता पार करण्यात अनेक अडचणी येत असल्याने अनेक रुग्णांचा वाटेतच मृत्यू झाल्याचा आकडा मोठा आहे. शिवाय दुचाकीच्या अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत. नुकताच एसटीचा अपघात झाला, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे हा रस्ता अजून किती बळी घेणार, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
फोटो: