अकोट : उत्तरीय तपासणीसाठी काढला दफन केलेला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:06 PM2018-06-13T16:06:27+5:302018-06-13T16:40:13+5:30
अकोट (जि. अकोला) : अकोट शहरातील डॉ. कैलास जपसरे यांच्याकडे उपचारार्थ दाखल असताना एप्रिल महिन्यात मृत्यू झालेल्या मनोज प्रभूदास तेलगोटे यांचा दफन केलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुधवारी काढण्यात येऊन पुन्हा विधीवत दफन करण्यात आला.
अकोट (जि. अकोला) : अकोट शहरातील डॉ. कैलास जपसरे यांच्याकडे उपचारार्थ दाखल असताना एप्रिल महिन्यात मृत्यू झालेल्या मनोज प्रभूदास तेलगोटे यांचा दफन केलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुधवारी काढण्यात येऊन पुन्हा विधीवत दफन करण्यात आला.
अकोट शहरातील मनोज प्रभूदास तेलगोटे यांचा शहरातील प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉक्टर जपसरे यांच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान २२ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. डॉक्टर जपसरे यांनी चुकीचा उपचार केल्याने त्याचा मृत्यू झाला व तो मरण पावल्या नंतर ही त्याला आयकॉन हॉस्पिटल अकोला येथे उपचारा साठी पाठवून त्याचे प्रेताची अवहेलना केली , असा आरोप करणारी तक्रार पोलिस स्टेशन अकोट शहर येथे प्राप्त झाल्यानंतर अकोट शहर पोलिसांनी सखोल तपासाअंती डॉक्टर कैलास जपसरे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तपासाचा भाग म्हणून मृतक मनोज तेलगोटे ह्याच्या मृत शरीराचे शवविच्छेदन होणे आवश्यक होते त्या साठी पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत यांची लेखी परवानगी प्राप्त करून शवविच्छेदन करण्या साठी न्यायवैद्यक तज्ज्ञांची आवश्यकता असल्याने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या आदेशाने बुधवारी डॉक्टर सचिन गाडगे व डॉक्टर मनीष साबळे व त्यांचे चमूने अकोट शहरालगतच्या ख्रिश्चन दफन भूमी मध्ये दफन करण्यात आलेल्या मृतक मनोज तेलगोटे यांच्या मृतदेहाचे उत्खनन करून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले व प्रेत परत विधिवत दफन करण्यात आले. वेळी पोलिस निरीक्षक गजानन शेळके, नायब तहसीलदार राजेश गुरव, तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे, मृतकचे नातेवाईक उपस्थित होते, शवविच्छेदन करून मृतकच्या मृत्यूचे निश्चित कारण समजण्यास मदत होणार आहे. सदर संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्याचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहेत।