अकोट पंचायत समितीचा कंत्राटी सहायकदोन हजारांची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 07:08 PM2018-02-26T19:08:42+5:302018-02-26T19:19:39+5:30
अकोला - अकोट पंचायत समितीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक म्हणून कार्यरत असलेल्या शिवकुमार भोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली.
अकोला - अकोट पंचायत समितीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक म्हणून कार्यरत असलेल्या शिवकुमार भोरे याला दोन हजार रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
अकोट तालुक्यातील एका शेतकºयास सिंचन विहीर मंजूर झालेली आहे. त्यांनी विहिरीचे काम पूर्ण केल्यानंतर झालेल्या कामाची देयके व मजुरांचे वेतन मिळण्यासाठी तसेच अंदाजपत्रक पुनर्मूल्यांकन करण्यासाठी यासोबतच मस्टर रजिस्टर तपासण्यासाठी अर्ज केला होता. यावर अकोट पंचायत समितीचा लाचखोर कंत्राटी तांत्रिक सहायक शिवकुमार ज्ञानेश्वर भोरे याने शेतकºयाला दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात २ फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये कंत्राटी तांत्रिक सहायक भोरे याने लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी अकोटातील एका खासगी हॉटेलमध्ये लाचेची रक्कम घेऊन भोरे याने शेतकºयास बोलावले. त्यानंतर शेतकºयाने दोन हजार रुपयांची रक्कम देताना शिवकुमार भोरे या लाचखोर कर्मचाºयास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई अकोला एसीबीचे प्रमुख संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनात गाडगे, सुनील राऊत यांनी केली.