अकोटः पत्रकाराविरुद्ध खंडणीच्या आरोपाखाली दोन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:21 AM2021-08-15T04:21:40+5:302021-08-15T04:21:40+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट तहसीलचे मंडळ अधिकारी नीळकंठ परशराम नेमाडे यांनी १० ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीत, माझ्याविरुद्ध पोर्टलवर बातम्या ...

Akot: Two charges filed against journalist for ransom | अकोटः पत्रकाराविरुद्ध खंडणीच्या आरोपाखाली दोन गुन्हे दाखल

अकोटः पत्रकाराविरुद्ध खंडणीच्या आरोपाखाली दोन गुन्हे दाखल

Next

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट तहसीलचे मंडळ अधिकारी नीळकंठ परशराम नेमाडे यांनी १० ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीत, माझ्याविरुद्ध पोर्टलवर बातम्या प्रसारित केल्या. अधिक बातम्या प्रसारित न करण्यासाठी पाच लाखांची मागणी केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून मोहन पांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मोहन पांडे अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, तसेच अकोट येथील गौणखनिज व्यावसायिक संतोष रामकृष्ण शेंडे यांनी १४ ऑगस्ट दिलेल्या तक्रारीत पत्रकार मोहन पांडे हा त्रास देतो, पोर्टलवर बातम्या प्रसारित केल्या. सर्व प्रकरण थांबवून बातम्या प्रसारित न करण्यासाठी एक लाखाची खंडणी मागितली. या तक्रारीवरून मोहन पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास अकोट शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाचपोर हे करीत आहेत.

Web Title: Akot: Two charges filed against journalist for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.