अकोटात शेतकरी आक्रमक

By admin | Published: June 4, 2017 05:04 AM2017-06-04T05:04:58+5:302017-06-04T05:12:15+5:30

शिवरायाला दुग्धाभिषेक : रस्त्यावर दूध ओतले, भाजीपाला फेकला.

Akota farmer aggressive | अकोटात शेतकरी आक्रमक

अकोटात शेतकरी आक्रमक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोटातील शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले असून ३ जून रोजी शेतकरी व दूध उत्पादकांनी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला, तसेच रस्त्यावर भाजीपाला फेकून सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. या प्रकारामुळे संपूर्ण रस्त्यावर दुधाचे पाट वाहू लागले.
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दूध उत्पादकांना २४ रुपये एवढा कमी भाव मिळत असल्याने दूध उत्पादकांसमोर संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने तसेच शेतीपूरक व्यवसाय असलेला पशुपालन व्यवसायसुद्धा धोक्यात आला आहे. या सर्व प्रकाराचा निषेध म्हणून स्थानिक शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला, तसेच रस्त्यावर दूध ओतण्यात आले. शिवाय, भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात आला. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने म्हशीच्या दुधाला ५० रुपये व गाईच्या दुधाला ४० रुपये भाव द्यावा, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, दुधाळ जनावरांचे खाद्य मार्केट अंतर्गत देण्यात येऊ नये, शासनाने पशुधन विमा योजना पुन्हा सुरू करावी, बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा, शेतीसाठी अखंड मोफत वीज पुरवठा व ठिबक, तुषार सिंचनाला अनुदान मिळावा आदी मागण्यांकरिता आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी तुषार पुंडकर, नानासाहेब भिसे, निखिल गावंडे, विशाल भगत, कुलदीप वसू, तुषार पाचकोर, कपिल ढोके, आनंद साबळे, अभिजित भिसे, रवींद्र डोबाळे, मधू लोखंडे, मुन्ना साबळे, श्रीयश चौधरी, सागर उकंडे, बजरंग मिसळे, संभाजी थोरात, रवी पवार, अवी घायसुंदर, विशाल चौधरी, आशिष गीते, आशिष पुंडकर, रोहित पुंडकर, निनाद मानकर, रोहित पितांबरवाले, प्रफुल्ल बोरकुटे, जयेश भिसे, उमेश ठाकूर, ओमप्रकाश हाडोळे, सोपान साबळे, दत्ता सिरसाट, ज्ञानेश्वर साबळे, विष्णू खडसे, प्रवीण वैराळे, उद्धव साबळे, जयंत रेळे, रफत अली, जुबेर अली, जमीर, तुकाराम भाकरे, ज्ञानेश्वर साबळे, उत्तम शनवारे, ज्ञानेश्वर बावस्कार, पप्पू महाजन, रजनीश पटेल, अजय पटेल आदींसह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आज अकोट "आठवडी बाजार बंद"चा निर्धार
आपल्या विविध मागण्यांकरिता शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपात शेतकरी बांधवांनी सहभागी होऊन रविवारी अकोट येथे भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटना व भाजीपाला असोसिएशनने केला आहे. शहरातील भाजीपाल्याच्या अडत व शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता बाजार भरविण्यात येऊ नये, याकरिता उशिरा रात्रीपर्यंत शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकार, अकोट तालुका प्रमुख प्रफुल्ल बदरखे, युवा आघाडी प्रमुख विक्रांत बोंद्रे, गजानन बोरोकार व्यापारी, अडत्यांना भेटून सहभागी होण्याचे आवाहन करीत होते.
शेतकऱ्यांनी केले मुलांना दूध वाटप
स्थानिक शिवाजी चौकात शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक करण्यात आला, तर रस्त्यावर दूध फेकण्यात आले. यावेळी आंदोलनात असलेल्या काही शेतकऱ्यांनी आपल्या कॅनमधील दूध या ठिकाणी असलेल्या गोरगरीब मुलांना वाटप केले. शेतकरी जितक्या तीव्रतेने आंदोलन करतात, तितक्याच हळव्या मनाने संवेदनशीलतेचा परिचय देतात.

Web Title: Akota farmer aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.