लिंगाणा शिखर सर करणाऱ्या अकोटच्या धिरजचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:58 IST2017-12-19T16:57:42+5:302017-12-19T16:58:42+5:30
अकोट : महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर म्हणून प्रसिध्द असलेल्या लिंगाणा शिखर आपल्या अपंगत्वावर मात करुन सर करणाºया अकोट येथील धीरज कळसाईत याचा १८ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला.

लिंगाणा शिखर सर करणाऱ्या अकोटच्या धिरजचा सत्कार
अकोट : महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर म्हणून प्रसिध्द असलेल्या लिंगाणा शिखर आपल्या अपंगत्वावर मात करुन सर करणाºया अकोट येथील धीरज कळसाईत याचा १८ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला.
स्थानिक श्रीराम नगर येथील धीरज कळसाईत गरीब परिस्थितीतून संकटांना तोंड देत त्याने आपल्या साहसीवृत्ती व इच्छाशक्तीने नवा आदर्श निर्माण केला आहे. धीरजला शारिरीक अपंगत्व असतांनाही समुद्रसपाटीपासून २९६९ उंच व जमिनीपासून ९०० फूट उंच असलेल्या रायगड जिल्ह्यातील लिंगाणा गडकोटाचे शिखर गाठले. धाडसी कामगिरीने आकोटचे नावलौकीक वाढविणाºया धीरज कळसाईत चा माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी गजानन गृपच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी त्याला आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरसेवक मनिष कराळे, योगेश वाकोडे, निलेश चंदन, बालु नहाटे, कुणाल कुलट, मंगेश चोरे, प्रशांत सिरसाट, निलेश अपराधे, अमोल विखे, निलेश अपराधे, मुरली कोकाटे, तपेस सेदाणी, संजय रेळे, सचिन गोमासे, अमोल मानकर, आशिष मजगे, मुन्ना फाटे, मनिष पतिंगे, किशोर मोडोकार आदीं उपस्थित होते.