सेतू अभ्यासक्रमाच्या निर्मितीत अकोटच्या शारीरिक शिक्षण शिक्षकांचा वाटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:44+5:302021-07-18T04:14:44+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी शाळा नियमित सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी शाळा नियमित सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गतवर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी करणे, ज्याद्वारे पुढीलवर्षीचा अभ्यासक्रम समजण्यात अडचण निर्माण होणार नाही, या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (एससीईआरटी) यांच्याकडून तज्ज्ञांचे विषयनिहाय व इयत्तानिहाय गट तयार करून सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. सेतू अभ्यासक्रमात तीन चाचण्यांचा समावेश आहे. या चाचण्या सेतू अभ्यासक्रमातील कृती पत्रिकांवर आधारित आहेत. कृतिपत्रिका सोडविताना काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांना शिक्षकांची मदत घ्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने ब्रीज कोर्स महत्त्वाचा आहे. या कोर्सच्या निर्मितीसाठी नीलेश झाडे व मुकुल देशपांडे यांनी समिती सदस्य म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. रेखा जुनगरे व श्री नरसिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक देव यांनी अभिनंदन केले.