आळंदा येथील जि.प. शाळेत सामाजिक न्याय दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:13 AM2021-06-27T04:13:45+5:302021-06-27T04:13:45+5:30
बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक ...
बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दि. साजरा करण्यात आला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य व विचारधारेनुसार ही जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वीणाताई मोहोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच डिगांबर म्हैसने यांची उपस्थिती होती. यावेळी कोरोना काळात शिक्षण सुरू करताना कोणती काळजी घ्यावी, याबद्दल चर्चा करण्यात आली. मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायासाठी केलेल्या विविध कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वीणाताई मोहोड यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात कोरोना सुरक्षेचे नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, स्वयंपाकी यांची उपस्थिती होती.
-------------------------
दानापूर ग्राम पंचायतीत शाहू महाराज जयंती साजरी
दानापूर : येथील ग्राम पंचायतीमार्फत छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच सपना धम्मपाल वाकोडे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. तसेच येथील जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात महावितरणचे कर्मचारी एस. एम. दारोकार यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेवराव वानखडे, मुख्याध्यापक विश्वेश्वर पातुरडे, शिक्षक व शिक्षिका आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पातुर्डे यांनी तर आभार डाबेराव यांनी मानले.