कोरोनाचा अलर्ट ; आयसोलेशन वार्डात व्हेंटीलेटरच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 10:33 AM2020-03-05T10:33:21+5:302020-03-05T10:33:34+5:30

येथे व्हेंटीलेटरच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.

Alert of Corona; Isolation ward not just ventilator! | कोरोनाचा अलर्ट ; आयसोलेशन वार्डात व्हेंटीलेटरच नाही!

कोरोनाचा अलर्ट ; आयसोलेशन वार्डात व्हेंटीलेटरच नाही!

Next

अकोला : इतर देशांपाठोपाठ भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज असलेल्या आयसोलेशन वार्डात आवश्यक कीट उपलब्ध असली, तरी येथे व्हेंटीलेटरच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.
राज्यात कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आढळला नाही; परंतु गत दोन दिवसांत इतर राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आरोग्य विभागही सतर्कता बाळगत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र आयसोलेट वार्डाची निर्मिती करण्यात आली आहे. वार्डात रुग्णांच्या चाचण्यांसाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध आहे. शिवाय, येथे कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मास्क, दस्तान्यांसह इतर आवश्यक साहित्यदेखील पुरविण्यात आले आहे; मात्र वार्डात व्हेंटीलेटरच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपाचे आॅक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली आहे.

म्हणून व्हेंटीलेटर नाही!
सर्वोपचार रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात जवळपास २० व्हेंटीलेटर आहेत. त्यातील काही व्हेंटीलेटर बंद पडल्याने येथे केवळ १५ ते १६ व्हेंटीलेटर सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे अतिदक्षता कक्षात रुग्ण व्हेंटीलेटरच्या प्रतीक्षेत असतात. अशा परिस्थितीत कोरोना वार्डात व्हेंटीलेटर हलविणे योग्य नसल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

रात्रीचा वार्ड कुलूपबंद !
सर्वोपचार रुग्णालयातील टीबी वार्डाच्या जुन्या इमारतीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेट वार्ड तयार करण्यात आला आहे. हा वार्ड इतर वार्डांपासून दूर अंतरावर आहे. शिवाय त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसाठी एकही सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे येथील महिला कर्मचारी रात्रीच्यावेळी अपघात कक्षात रुग्णसेवा देतात. त्यामुळे हा वार्ड रात्रीच्यावेळी कुलूपबंद केला जातो.

कोरोना व्हायरस बाधित रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयात नवीन आयसोलेट वार्डात काय सुविधा आहेत, यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांना पत्राद्वारे विचारणा केली आहे. त्यानुसार, उपलब्ध बेडची संख्या, व्हेंटीलेटर, पीईटी कीट, एन-९५ मास्कची उपलब्धतेबाबत माहिती मागविण्यात आली आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

Web Title: Alert of Corona; Isolation ward not just ventilator!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.