रेमडेसिविर गोरखधंद्यातील पाचही आरोपी वैद्यकीय क्षेत्रातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:12+5:302021-04-25T04:18:12+5:30
रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करताना स्थानिक गुन्हे शाखेने जय श्रीराम मेडिकल येथे काम करणारा आशिष मते याला ताब्यात घेतल्यानंतर ...
रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री करताना स्थानिक गुन्हे शाखेने जय श्रीराम मेडिकल येथे काम करणारा आशिष मते याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या माहितीवरून एस. पी. सेल्स येथे काम करणारा राहुल गजानन बंड याला ताब्यात घेतले. या दोघांकडून तीन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. त्यानंतर सचिन हिंमत दामोदर हा ओझोन हॉस्पिटल येथे काम करीत असून प्रतीक सुरेश शहा सार्थक मेडिकल येथे फार्मासिस्ट असल्याची माहिती समोर आली आहे. तर यापूर्वी बिहाडे हॉस्पिटल येथे काम करणारा अजय राजेश आगरकर हादेखील याच क्षेत्रातील असल्याने या पाच जणांच्या पाठीमागे बडे मेडिकल संचालक व काही डॉक्टर असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
डॉक्टर तिरपुडे कोण?
बनावट नियुक्तिपत्र देणाऱ्या टोळीने फिटनेस सर्टिफिकेटसाठी डॉक्टर तिरपुडे यांचे लेटरहेड वापरले आहे. त्यामुळे हे डॉ. तिरपुडे कोण, याची चौकशी पोलीस करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये डॉक्टर तिरपुडेसह अनेकजण आता पोलिसांच्या रडारवर असून त्यामुळे अनेकांचे चेहरे आता समोर येणार आहेत.