पारस प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी आज होणार सर्वपक्षीय सभा!

By admin | Published: July 17, 2017 03:16 AM2017-07-17T03:16:28+5:302017-07-17T03:16:28+5:30

विविध संघटनांचाही राहणार सहभाग

All-party meetings will be held today for the expansion of the Paras project. | पारस प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी आज होणार सर्वपक्षीय सभा!

पारस प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी आज होणार सर्वपक्षीय सभा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : पारस येथील औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी ६६० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प पारस येथेच सुरू करावा, या मागणीने आता जनमानसात चांगलाच जोर धरला आहे. या मागणीला पारस परिसरातील नागरिकांचा जोरदार पाठिंबा असल्याने या प्रकल्पाच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी पारस येथे १७ जुलैच्या सायंकाळी ४ वाजता सर्व पक्षीय सुशिक्षित बेरोजगार, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कंत्राटदार संघटना, शेतकरी अभियंता संघटना , संघर्ष समिती, सुशिक्षित बेरोजगार संघटना आदींच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पारस येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा विद्युत निर्मिती प्रकल्प व्हावा, यासाठीचा लढा ही पारसच्या अस्तित्वाची लढाई असल्याने सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून पारस येथे ६६० मेगावॅटचा प्रकल्प झालाच पाहिजे, ही भूमिका घेऊन या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पारस येथील प्रकल्पाच्या विस्तारीकरणाबाबतचे सर्व लढे आत्तापर्यंत पारसवासीयांनी जिंकल्याचा इतिहास आहे.
त्यामुळे आता ६६० मेगावॅट क्षमतेचा विद्युत निर्मिती प्रकल्प व्हावा, याबाबतचा लढासुद्धा जिंकण्यासाठी १७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता पारस येथे सभा घेऊन प्रकल्पाबाबत निर्णय घेऊन दिशा ठरविण्यात येणार आहे. या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सभेच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Web Title: All-party meetings will be held today for the expansion of the Paras project.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.