मानकी जिल्हा परिषद शाळेच्या सर्वच खोल्या डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:27 PM2020-02-10T12:27:13+5:302020-02-10T12:27:20+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मानकी येथे डिजिटल झालेल्या सर्व वर्गखोल्यांचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.
अकोला : जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मानकी येथे डिजिटल झालेल्या सर्व वर्गखोल्यांचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.
कार्यक्रमात अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती रूपाली गवई तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य वर्षा वजिरे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती धनंजय दांदळे, पंचायत समिती सदस्य नीलेश इंगळे, अफसर भाई, सरपंच सुनीता म्हैसने, माजी सरपंच गौतम सिरसाट, गटशिक्षणाधिकारी गौतम बडवे, केंद्रप्रमुख मनसागर वानखडे, मंगेश गवई, मंगेश म्हैसने, संजय पेटकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश सिरसाट, प्रमोद सिरसाट व प्रवीण सिरसाट उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सतीश वरोकार यांनी केले. यावेळी त्यांनी शाळा डिजिटल करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच आगामी वर्षात सेमी इंग्रजी व कॉन्व्हेंट सुरू करणार असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात सभापती रूपाली गवई यांनी आणखी उपक्रम राबवावे तसेच तालुक्यातील शाळेच्या व शिक्षकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन दिले. संचालन विवेक रिंगणे यांनी केले. आभार ब्रह्मा गोलाईत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंजना आपोतीकर, पौर्णिमा घरडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांनी सहकार्य केले.