सर्व पाण्यात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:03+5:302021-07-23T04:13:03+5:30

पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी १७ ...

In all the water ...! | सर्व पाण्यात...!

सर्व पाण्यात...!

Next

पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी १७ लोकांना जीवनदान दिले सात तासांच्या कालावधीत दोनद नाला, आमराई नाला, खोलेश्वर स्मशानभूमी विद्रुपा नदी येथील ठीकाणी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले.

महपालिकेच्या नियाेजनाचे पितळ उघडे? सत्ताधारी म्हणतात प्रशासनाचे अपयश मान्सूनपूर्व नालासफाईची कामे व्यवस्थित न झाल्याचे बुधवारच्या पावसाने उघड केले. शहरातील अनेक भागांत नाल्या तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले, अनेक शाॅपिंग काॅम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याने लाखाे रुपयांचा माल भिजला, गुरुवारी दिवसभर माेटारपंप लावून हे पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू हाेते. महापालिकेचे आपत्तीव्यवस्थापन कुठेही दिसून आले नाही दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने नियाेजनात प्रशासन अपयशी पडल्याचे खापर फाेडले आहे. भाजपच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की अकोला महानगरपालिकेचे महापौर व पदाधिकारी यांनी दोन महिन्यांपूर्वी शहरात पावसामुळे होणारे नुकसान, आपत्कालीन व व्यवस्थेसंदर्भात नियोजन करण्यासंबंधी निर्देश दिले होते, परंतु मनपा प्रशासनाने दाखल घेतली नाही.

आपत्ती नियाेजनात प्रशासन नापास, जिल्हाधिकाऱ्यांसह सिईओही अमरावतीत संपूर्ण जिल्हाभरात पावसाने थैमान घातल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी व प्रशासनाची बेफिकिरी समाेर आली. दुसरीकडे जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, असे उच्चपदस्थ अधिकारी जिल्ह्याठिकाणी उपस्थित नव्हते हे सर्व अधिकारी आयुक्तांनी बाेलाविलेल्या बैठकीसाठी निघून गेले हाेते. या परिसरात सर्वाधिक हानी गीतानगर, आझाद कोलोनी, अंबिकानगर, कृषीनगर, खेताननगर, खडकी परिसर, मलकापूर, आश्रयनगर, लक्ष्मीनगर, शिवसेना वसाहत, नवीन किराणा बाजार व शहराच्या इतर भागांमध्ये ३ ते ५ फुटांपर्यंत जलाशय निर्माण झाला व अनेक वाहने व घरांचे नुकसान झाले. जवळपास अकोला शहरातील १५ हजार घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच ग्रामीण भागातील आपातापा, हातरून, रिधोरा, खडकी, डोंगरगाव, दालंबी, व्याळासह १०० गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Web Title: In all the water ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.