कुरणखेड येथे पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:25+5:302021-06-21T04:14:25+5:30

त्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केलेल्या तक्रारीत बांधकामामध्ये माती मिश्रित डस्ट, निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात ...

Allegation of corruption in the work of drinking water scheme at Kurankhed! | कुरणखेड येथे पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप!

कुरणखेड येथे पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप!

googlenewsNext

त्यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केलेल्या तक्रारीत बांधकामामध्ये माती मिश्रित डस्ट, निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याची टाकी कधीही कोसळू शकते. गावात टाकण्यात आलेल्या पाईपलाईनसाठी खड्ड्यांचे खोलीकरण हे नियमानुसार नसल्याचे नमूद केले आहे. पाईपलाईनसाठी वापरण्यात आलेले पाईप निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले आहेत. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी कुरणखेड येथील सामाजिक कार्यकर्ते विकास मोहोड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

फोटो:

या योजनेसाठी ग्रामपंचायतला कोणताही निधी प्राप्त झाला नसून, हे काम राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे आहे. त्यामुळे ग्रामपंचायतला यासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

-प्रगती नवनीत पांडे, सरपंच कुरणखेड

कुरणखेड येथे काम चालू असलेले काम नियमानुसार आणि निकषानुसार चालू आहे. यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. ज्यांनी तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीची दखल वरिष्ठ अधिकारी घेतील.

-अनिल चव्हाण, उपकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अकोला

Web Title: Allegation of corruption in the work of drinking water scheme at Kurankhed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.