नगराध्यक्षांनी बेकायदा सभा घेतल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:13 AM2021-07-09T04:13:53+5:302021-07-09T04:13:53+5:30
येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी विशेष सभा बोलावली होती. या सभेची सूचना ६ जुलै रोजी काढण्यात आली होती. ...
येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी विशेष सभा बोलावली होती. या सभेची सूचना ६ जुलै रोजी काढण्यात आली होती. १ दिवसांपूर्वीच ७ जुलै रोजी लेखी नोटीस देण्यात आली. ही विशेष सभा म्हणून दाखविण्यात आली असून विशेष सभेची सूचना ३ दिवसांपूर्वी देणे आवश्यक व कायदेशीर आहे; परंतु १ दिवसापूर्वी सूचना देण्यात आली, सभेतील विषय हा आपत्कालीन नसून एक दिवसापूर्वी देण्यात आलेल्या सभेची सूचना बेकायदा असल्याचा आरोप तक्रारीत केला. इतक्या कमी कालावधीत या विषयाची चौकशी करून अभ्यास करणे शक्य नाही. तसेच विशेष सर्वसाधारण सभेचे नाव टाकून आपत्कालीन तातडीचे सभेचे नाव देऊन या सभेकरिता आपत्कालीन तातडीचे सभेचे नियम पालन करण्यात आले. यामुळे ही सभा बेकायदा नियमबाह्य असून या सभेत होणारे ठरावसुद्धा कायदेशीर म्हणता येत नसल्याचा आरोपही केला. याकरिता या सभेतील ठरावाची अंमलबजावणी न करता ही सभा बेकायदा म्हणून रद्द करण्यात यावी व पुन्हा सदस्यांना नियमाचे पालन करून योग्य वेळ देण्यात येऊन सभा बोलविण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत केली आहे. याबाबतचे लेखी पत्र नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मितेश मल्ल, नगर परिषद सदस्य गोवर्धन पोहरकार, अरुणा मंगेश ठाकरे, दिपाली नीलेश धनभर, सुनीता शेखर भुजबले या पाच सदस्यांनी मुख्याधिकारी यांना दिले.
तिरुपती नगरमधील एकाच खुल्या जागेतील दोन सभागृह प्रस्तावित झाल्यामुळे त्यावर चर्चा करून निर्णय घेणे अत्यावश्यक होते. म्हणून सभा बोलविण्यात आली होती.
- जयश्री पुंडकर, नगराध्यक्ष, न.प. तेल्हारा