शरद पवारांमुळे आरक्षण लांबणीवर, मराठा सुराज्य संघाचे प्रणय सावंत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 07:40 PM2017-12-21T19:40:51+5:302017-12-21T19:41:00+5:30

मराठा समाजाचे सर्वोच्चनेते शरद पवारांमुळे मराठा समाजाला आरक्षणा  पासून दूर राहावे लागले व आरक्षण लांबणीवर पडले. तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. शरद पवार हे सुद्धा मराठा समाजाचे मोठे नेते असताना त्यांच्या सत्ता काळात देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, असा आरोप मराठा सुराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रणय सावंत यांनी येथे केला.

The allegations of Pranay Sawant of the Maratha Surajya Sanghatan, due to the resignation of Sharad Pawar, have been alleged | शरद पवारांमुळे आरक्षण लांबणीवर, मराठा सुराज्य संघाचे प्रणय सावंत यांचा आरोप

शरद पवारांमुळे आरक्षण लांबणीवर, मराठा सुराज्य संघाचे प्रणय सावंत यांचा आरोप

Next

शेगाव : मराठा समाजाचे सर्वोच्चनेते शरद पवारांमुळे मराठा समाजाला आरक्षणा  पासून दूर राहावे लागले व आरक्षण लांबणीवर पडले. तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते. शरद पवार हे सुद्धा मराठा समाजाचे मोठे नेते असताना त्यांच्या सत्ता काळात देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, असा आरोप मराठा सुराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रणय सावंत यांनी येथे केला.
शेगाव विश्राम भवन येथे  २० डिसेंबर रोजी विश्रामगृह येथे  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की,  मागील वर्षी मराठा आरक्षण मिळावे यासाठी श्रींना साकडे घातले होते. आतापर्यंत निघालेल्या मोर्चातील  गर्दी बोलकी होती. तत्कालीन आघाडी सरकारच्या कार्यकाळात, शिष्टमंडळास कोणतीही दाद मिळत नव्हती. मिळालेले आरक्षण हे तकलादू होते. त्याकाळी नारायण राणे यांनी मराठा आरक्षण संबंधीत योग्य अहवाल सादर केला होता. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांचे संगनमतामुळे आरक्षणाचा मुद्दा लांबणीवर पडला. यावृत्तीमुळे आरक्षण न्यायालयात अडकले विध्यमान फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या अभ्यासा करिता वकीलांची फौज निर्माण केली. यामुळे मंत्री मंडळ उपसमितीच्या मंत्री गणामुळे २०१८ साली मराठा आरक्षण मिळणारच अशी आशा प्रणय सावंत यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला संदीप कठोळे यांचेसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

मराठा समाजाचे मोठे नुकसान !
मराठा समाजाच्या नेत्यांनी समाजाचे फारमोठे नुकसान केल्याने, समाजातील युवक अधोगती कडे गेला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी ५० ते ५१ मोर्र्च निघाले मात्र, कोणत्याही प्रकारचे नुकसान केले नाही. शांततेच्या मागार्ने निघतील यापुढेही मोर्चे काढण्यात येतील. इतर समाजाच्या आरक्षणा धक्का न लावता तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्यात यावे अशी मराठा सुराज्य संघाची मागणी राहणार असल्याचे  प्रणय सावंत म्हणाले.

Web Title: The allegations of Pranay Sawant of the Maratha Surajya Sanghatan, due to the resignation of Sharad Pawar, have been alleged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.