वर्षभर धान्यापासून वंचित ३६ हजार लाभार्थींना वाटप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:49 AM2017-09-28T01:49:01+5:302017-09-28T01:49:14+5:30

अकोला : अन्न सुरक्षा कायद्यानुसार ऑक्टोबर २0१६ पासूनच  सार्वजनिक वितरण प्रणालीचे स्वस्त धान्य मिळण्यासाठी पात्र  असलेल्या लाभार्थींना वर्षभर वंचित ठेवण्यात आले.  प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच  चालू महिन्यातच लाभार्थींना धान्य वाटप सुरू करण्यात आले.  त्यानुसार अकोला शहरातील जवळपास ८५६५ शिधापत्रिकांवर  असलेल्या ३६,८३0 लाभार्थींनी धान्याची उचल करावी, असे  आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. 

Allocation of 36,000 beneficiaries to the deprived of grains all through the year | वर्षभर धान्यापासून वंचित ३६ हजार लाभार्थींना वाटप सुरू

वर्षभर धान्यापासून वंचित ३६ हजार लाभार्थींना वाटप सुरू

Next
ठळक मुद्देआठ हजार शिधापत्रिकाधारकांचा समावेशप्रभाव लोकमतचा

सदानंद सिरसाट । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अन्न सुरक्षा कायद्यानुसार ऑक्टोबर २0१६ पासूनच  सार्वजनिक वितरण प्रणालीचे स्वस्त धान्य मिळण्यासाठी पात्र  असलेल्या लाभार्थींना वर्षभर वंचित ठेवण्यात आले.  प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच  चालू महिन्यातच लाभार्थींना धान्य वाटप सुरू करण्यात आले.  त्यानुसार अकोला शहरातील जवळपास ८५६५ शिधापत्रिकांवर  असलेल्या ३६,८३0 लाभार्थींनी धान्याची उचल करावी, असे  आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. 
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २0१३ ची राज्या त १ फेब्रुवारी २0१४ पासून अंमलबजावणी सुरू झाली.  त्यानुसार  ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के आणि शहरी भागा तील ४५.३४ टक्के लाभार्थी संख्येला अन्नसुरक्षेचे कवच देण्या त आले. शासनाने १७ डिसेंबर २0१३ रोजीच ही संख्या निश्‍चित  करण्याचा आदेश दिला. त्यानंतर पात्र लाभार्थींची संख्या १३  ऑक्टोबर २0१६ रोजीच्या निर्णयाने बदलण्यात आली. त्यावेळी  अकोला जिल्ह्यात प्राधान्य गटातील २३,४८९ शिधा पत्रिकांमध्ये असलेल्या ११७३४६ लाभार्थींना धान्य सुरू  ठेवण्यात आले, तर ४७,१७२ केशरी शिधापत्रिका असलेल्या  कुटुंबातील २ लाख २९१२१ लाभार्थी वंचित ठेवण्यात आले.  त्या लाभार्थींंपैकी ३६८३0 लाभार्थीं संख्येच्या शिधा पत्रिकाधारकांची निवड करून त्यांना स्वस्त दराने धान्य पुरवठा  सुरू करणे आवश्यक होते. मात्र, वर्षभर लाभार्थी निवड प्रक्रिये तच वेळ दवडण्यात आला. त्यामुळे हजारो लाभार्थींंवर अन्याय  झाला. तसेच अन्नसुरक्षा कायद्यातील तरतुदींची पायमल्ली  करण्यात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १९ सप्टेंबर रोजी  प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत शहर अन्नधान्य वितरण  अधिकारी कार्यालयाने दुकानदारांकडून प्राप्त प्रस्तावांना ता तडीने मंजुरी देत, त्यांच्या नावाचे धान्यही मंजूर केले. गोदामातून  त्या धान्याची उचल देण्यात आली. ते धान्य संबंधित लाभार्थींंना  वाटप करण्याचे बजावण्यात आले. 

निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक करणार तपासणी
दुकानदारांनी नव्याने पात्र लाभार्थींंच्या नावे उचललेले धान्य  त्यांना मिळाले की नाही, याची पडताळणी करण्याचा आदेश  शहर विभागाचे निरीक्षण अधिकारी अजय तेलगोटे यांच्यासह  पुरवठा निरीक्षक संतोष कुटे, दामोदर यांना देण्यात आला आहे. 

लाभार्थींंनी दुकानांमध्ये पात्रता यादीत नाव असल्याची खात्री  करावी, त्यानंतर दुकानदारांकडून धान्य घेऊन जावे, स्वस्त  धान्य दुकानदारांनी नव्याने पात्र लाभार्थींंची यादी दर्शनी भागावर  पाहण्यासाठी लावून ठेवावी. त्यांची तपासणी केली जाणार आहे. 
- संतोष शिंदे, 
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला. 

Web Title: Allocation of 36,000 beneficiaries to the deprived of grains all through the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.