१ लाख ४३ हजार शेतक-यांना मदतीचे वाटप

By admin | Published: January 29, 2015 01:16 AM2015-01-29T01:16:46+5:302015-01-29T01:39:38+5:30

अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना ७३ कोटी १७ लाख रुपयांच्या मदतीचे वाटप.

Allocation of funds to 1 Lakh 43 thousand farmers | १ लाख ४३ हजार शेतक-यांना मदतीचे वाटप

१ लाख ४३ हजार शेतक-यांना मदतीचे वाटप

Next

अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये मंगळवार, २७ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ९६८ शेतकर्‍यांना ७३ कोटी १७ लाख रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात ७५ कोटी ७ लाखांचा मदत निधी शासनाकडून प्राप्त झाला. गेल्या दहा दिवसांपासून मदतीचे वाटप जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले. त्यामध्ये २७ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात १ लाख ४३ हजार ९६८ दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात ७३ कोटी १७ लाखांची मदत जमा करण्यात आली.

Web Title: Allocation of funds to 1 Lakh 43 thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.