ग्रामीण सार्वजनिक शौचालयसाठी निधी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 01:55 PM2019-09-20T13:55:46+5:302019-09-20T13:55:49+5:30
जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली जात आहे.
अकोला : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली जात आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी वाटप करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून येते. त्यावर पर्याय म्हणून सार्वजनिक शौचालयांची निर्मिती स्वच्छ भारत अभियानातून केली जाणार आहे. त्या शौचालयांचे व्यवस्थापन ग्रामपंचायतऐवजी सुलभ शौचालयाकडे दिल्यास देखभाल व सुविधा दोन्ही स्तरावर चांगले व्यवस्थापन होऊ शकते. त्यासाठी चर्चेतून निर्णय घेतला जाणार आहे.
सार्वजनिक शौचालय निर्मिती होणाऱ्या गावांमध्ये गोरेगाव खुर्द, बोरगाव मंजू, कुरणखेड, गांधीग्राम, घुसर, कापशी रोड, दहीहांडा, येवता, कानशिवणी, येळवण, मुंडगाव, चोहोट्टा बाजार, वरुड विटाळी, जऊळका, शहापूर रूपागड, अकोलखेड, निमकर्दा, कान्हेरी गवळी, हातरुण, वाडेगाव, निंबा, पुनोती बुद्रूक, गोरव्हा, धाबा, खेर्डा खुर्द, कंझरा, राजुरा घाटे, कानडी, माटोडा, राजनापूर खिनखिनी, अडगाव बुद्रूक, चितलवाडी, सौंदळा, हिवरखेड, आडसूळ, दानापूर, माळेगाव बाजार, नेर, बाभूळगाव, मळसूर, आलेगाव, चतारी, शिर्ला, नवेगाव, उमरा, भंडारज बुद्रूक, केलपाणी, गुल्लरघाट, सोमठाणा, अमोना व भारुखेडाचा समावेश आहे. त्यापैकी काही गावांमध्ये निधी वाटप करण्यात आला आहे.