किसान सेफ्टी किटचे खासगी रुग्णालयातही वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:38 PM2020-04-11T17:38:17+5:302020-04-11T17:38:27+5:30
किसान सेफ्टी किटचा डॉक्टरांना चांगलाच आधार होत आहे.
अकोला : सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यातच रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी सुरक्षेच्या उपाययोजना अद्यापही पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. या परिस्थितीत महेश किसान सेफ्टी किटचा डॉक्टरांना चांगलाच आधार होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानंतर खासगी रुग्णालयांमध्येही या किटचे मोफत वाटप उत्पादक महेश बजाज यांनी केले आहे.
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’सोबतच सॅनिटायझरचा वापर हे प्रभावी उपाय आहेत. त्यापैकी रुग्णांसोबत संपर्क येणाºया डॉक्टरांना ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पर्याय वापरता येत नाही. त्यांना सतत रुग्णांच्या संपर्कात राहावे लागते. या परिस्थितीत विषाणूचा शरीराशी संपर्क न येणारी साधने वापरणे गरजेचे आहे. त्यासाठी महेश किसान सेफ्टी किट उपयुक्त आहे. त्या किटचे दोन दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वाटप करण्यात आले. त्यानंतर शहरातील आॅयकॉन रुग्णालयातही शनिवारी किट देण्यात आल्या. यावेळी किसान सेफ्टी किटचे महेश बजाज यांच्यासह डॉ. एस. एम. अग्रवाल, डॉ. के. के. अग्रवाल, डॉ. राम शिंदे, डॉ. दीपक मोरे, डॉ. राजेश काटे, डॉ. कमल लढ्ढा, डॉ. सौरभ कारणे उपस्थित होते. विशेष म्हणजे, मालेगाव येथील कृषी विभागाच्यावतीनेही तेथील डॉक्टरांना या किटचे वाटप करण्यात आले आहे.