सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:20 AM2021-05-21T04:20:27+5:302021-05-21T04:20:27+5:30
अकोला : कोरोना काळात सलून व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सलून दुकाने सुरू करण्याची ...
अकोला : कोरोना काळात सलून व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी नाभिक समाज दुकानदार संघटना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या कालावधीत सलून दुकाने बंद ठेवण्यात आली. लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर सलून व्यवसाय सुरू करण्यात आला; मात्र कोरोना संसर्गामुळे पुन्हा लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या कालावधीत सलून दुकाने बंद करण्यात आली आहेत. दुकाने बंद असल्याने, सलून व्यावसायिकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठिण झाले आहे. तसेच बँकेचे कर्ज, दुकानाचे भाडे, वीज देयक भरायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बंद असलेली सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी नाभिक समाज दुकानदार संघटना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी नाभिक समाज दुकानदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजानन वाघमारे, शिवलाल माझोडकर, पांडुरंग मानकर, प्रवीण पळसकर, मो. एजाज मो.सिराज आदी पदाधिकारी उपस्थित होते.
....................फोटो......................................