आलेगावातील दारू अड्ड्यावर धाड
By admin | Published: April 30, 2017 07:43 PM2017-04-30T19:43:55+5:302017-04-30T19:43:55+5:30
आलेगाव : स्थानिक उमरेश्वर मंदिरासमोरील घरातील दारूच्या अड्ड्यावर चान्नी पोलिसांनी धाड घालून अवैध गावठी दारूसह साठ हजार रुपयांचा माल जप्त केला.
सात आरोपींना अटक, आठ जण पसार
आलेगाव : स्थानिक उमरेश्वर मंदिरासमोरील घरातील दारूच्या अड्ड्यावर चान्नी पोलिसांनी धाड घालून अवैध गावठी दारूसह साठ हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी १५ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यापैकी सात आरोपींना अटक करण्यात आली.
चान्नीचे ठाणेदार वैभव पाटील यांनी रविवारी सकाळी ६ वाजता त्यांच्या सहकाऱ्यांसह खासगी गाडीमध्ये येऊन येथील दारू अड्ड्यावर धाड टाकून चार ते पाच घरांमधून दारूचा साठा व साहित्यासह साठ हजार रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी सै. इस्माइल सै. खाजा, सै. रोशन सै. जगोदिन, कुबराबी जगोदीन, सै. सलीम सै. रोशन, सै. समीर सै. अमीर, सै. इरफान सै. रोशन, शहाजदखाँ जफर खाँ यांना अटक केली असून, उर्वरित आठ आरोपी पसार झाले असल्याचे पोलसांनी सांगितले. त्यामध्ये सै. युसूफ जगोदीन, जफरखाँ ऊर्फ दादा मिया, वहिदाबी जफरखाँ, सै. अमीर सै. खाजा, आरीफाबी, सायमा खातून सै. समीर, साराबी शेरखाँ, समीर खाँ शेरखाँ हे आठजण पसार झाले आहेत. या पंधरा आरोपींविरुद्ध पोलिसांनी ६५ (ड) व ३२८ कलमानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.