नेहमी सकारात्मक राहून कार्यरत राहा- विजयसिंह गहिलोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:19 AM2021-03-31T04:19:19+5:302021-03-31T04:19:19+5:30

कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत आपण सेवानिवृत्तीनंतर उत्कृष्टप्रकारे शेती करून व नवनवीन प्रयोग करून चांगली शेती कशाप्रकारे ...

Always stay positive and keep working - Vijay Singh Gehlot | नेहमी सकारात्मक राहून कार्यरत राहा- विजयसिंह गहिलोत

नेहमी सकारात्मक राहून कार्यरत राहा- विजयसिंह गहिलोत

Next

कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत आपण सेवानिवृत्तीनंतर उत्कृष्टप्रकारे शेती करून व नवनवीन प्रयोग करून चांगली शेती कशाप्रकारे केली जाते याचे उदाहरण त्यांनी प्रस्थापित केले. स्वतःचा वाढदिवस स्वतःच्या शेतातील कलिंगड कापून साजरा केला. महामार्गावर जी वृक्षतोड झालेली आहे त्याची भरपाई म्हणून ६३ कडुलिंबाची झाडे लावून वाढदिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी स्नेहप्रभादेवी गहिलोत, रणजितसिंह गहिलोत नागपूर हे उपस्थित हाेते. यावेळी संस्थेच्या सचिव स्नेहप्रभा गहिलोत, रणजीतसिंह गहिलोत यांचेही भाषण झाले. यावेळी प्राचार्य बी. एम. वानखडे, एस.एस. श्रीनाथ तुळसाबाई कावल विद्यालय बाभूळगाव, उपप्राचार्य एस. बी. ठाकरे, उपमुख्याध्यापक तारापुरे, पर्यवेक्षक अंशुमनसिंग गहिलोत उपस्थित होते. संचालन प्रा. पी. पी. वाकोडे, प्रास्ताविक प्राचार्य बी. एम. वानखडे, मनोगत प्राध्यापिका के. व्ही. तायडे यांनी केले. आभार डॉ. ई. एस.सुर्वे यांनी मानले.

Web Title: Always stay positive and keep working - Vijay Singh Gehlot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.