सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी, अमाेल मिटकरी यांनी दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 20:40 IST2024-06-25T20:40:35+5:302024-06-25T20:40:54+5:30
Akola News: सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी, अमाेल मिटकरी यांनी दिले संकेत
अकोला - सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक पक्ष जास्तीतजास्त जागांवर अडून बसलेला आहे. अशात सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
सध्या महायुतीमध्ये अजित पवार गटाचे ४५ आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे त्यापेक्षा अधिक जागा मिळणे गरजेचे आहे. विधानसभेत सन्मानजनक जागा न मिळाल्यास अजित पवार गटाची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचेही आमदार मिटकरी यांनी बोलून दाखविले. अकोला व वाशिम जिल्ह्यात विधानसभेसाठी सात जागांवर पक्षाचा दावा असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.