अमरावती विद्यापीठ तायक्वांदो संघ घोषित
By admin | Published: March 2, 2016 02:39 AM2016-03-02T02:39:55+5:302016-03-02T02:39:55+5:30
मुलींच्या संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर ३ ते १२ मार्च दरम्यान अकोल्याता होणार.
अकोला: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची तायक्वांदो (मुले व मुली) संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. निवड झालेला संघ अमृतसर येथे गुरू नानकदेव विद्यापीठात १६ ते २१ मार्च दरम्यान होणार्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणार आहे. मुलींच्या संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर अकोल्यातील आरएलटी विज्ञान महाविद्यालयात ३ ते १२ मार्च या कालावधीत होणार आहे.
मुलांच्या संघामध्ये करुण गुरुंग (डीसीपीई, अमरावती), किशन महाले (डीसीपीई, अमरावती), शशांक इंगोले (जेडीपीएस, दर्यापूर), सूरज मांगे (जय बजरंग शारीरिक शिक्षण महाविद्यालय, कुंभारी अकोला), बळवंत बोबडे (श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती), शुभम ढोके (बाबाजी दाते महाविद्यालय, यवतमाळ), हरवान जाफर (डीसीपीई, अमरावती), प्रकाश वर्मा (डीसीपीई, अमरावती), तर राखीव खेळाडू म्हणून प्रतीक सोनोने (गणेश महाविद्यालय, कुंभारी अकोला), सचिन छप्पानी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती) सहभागी होतील.
मुलींच्या संघात रू पाली मानकर (गुलाम नबी आझाद महाविद्यालय, बाश्रीटाकळी अकोला), कोयल देवगिरीकर (यवतमाळ), मेघा अलोणे (विद्याभारती महाविद्यालय, अमरावती), मरिना राय (डीसीपीई, अमरावती), मयूरी रेखाटे (नरसिंग महाविद्यालय, आकोट), राधा शर्मा (व्यवस्थापन महाविद्यालय, खामगाव), स्वाती यादव (आरएलटी महाविद्यालय, अकोला), हर्षा अग्रवाल (आरएलटी महाविद्यालय, अकोला), तर राखीव खेळाडू म्हणून पूनम छप्पानी (विद्याभारती महाविद्यालय, अमरावती), स्नेहा कोकस (सावित्रीबाई फुले महाविद्यालय, वाशिम) सहभागी होतील. मुलांच्या संघाचे शिबिर अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ५ ते १४ मार्च या कालावधीत आयोजित केले आहे.