आंबेडकरांचा ‘ओवेसी’ प्रयोग; ‘एमआयएम’सोबत आघाडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:44 PM2018-09-17T12:44:32+5:302018-09-17T13:31:15+5:30

अकोला: सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला.

Ambedkar' tie knowt with ovaisi's 'MIM' | आंबेडकरांचा ‘ओवेसी’ प्रयोग; ‘एमआयएम’सोबत आघाडी 

आंबेडकरांचा ‘ओवेसी’ प्रयोग; ‘एमआयएम’सोबत आघाडी 

googlenewsNext
ठळक मुद्दे पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शवित त्यांनी काँग्रेसकडे दहा जागांचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर चर्चा होण्याअगोदरच त्यांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा मुर्हूतही जाहीर केला. हा ‘ओवेसी’ प्रयोग पश्चिम वºहाडासह मराठवाड्यातील काही मतदारसंघांत नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे.

-  राजेश शेगोकार

अकोला: सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणातअकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाºया अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शवित त्यांनी काँग्रेसकडे दहा जागांचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर चर्चा होण्याअगोदरच त्यांनी ‘एमआयएम’सोबत आघाडीचा मुहूर्तही जाहीर केला. आंबेडकरांच्या हा आणखी एक राजकीय प्रयोग आहे. या ‘ओवेसी’ प्रयोगाचा पश्चिम वºहाडासह मराठवाड्यातील काही मतदारसंघांत नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे.
 अ‍ॅड. आंबेडकरांनी ९० च्या दशकात ‘सामाजिक अभियांत्रिकी’च्या माध्यमातून सत्ता मिळविण्याचा यशस्वी प्रयोग अकोल्यात केला. अकोला पॅटर्न नावाने ओळखल्या जाणाºया या प्रयोगाचे राजकीय नाव म्हणजे ‘भारिप बहुजन महासंघ’. १९९० ते २००४ पर्यंत या प्रयोगाने सुवर्णकाळ अनुभवला, असे म्हणता येईल. यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांकडे दोन ‘हुकुमी एक्के’ होते. यातील एक म्हणजे आंबेडकर, हे ब्रँडनेम, तर दुसरे म्हणजे स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची बांधलेली मोट. यामुळेच अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक ठिकाणी त्यांना यश अनुभवता आले. स्वत: आंबेडकर हे दोन वेळा खासदार झाले. डी. एम. भांडे, मखराम पवार, रामदास बोडखे यांना मंत्रिपदाची ऊबही मिळाली. हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांना आमदार म्हणून मिरविता आले. अकोल्याची जिल्हा परिषद आजतागायत भारिप-बमसंकडे कायम राहिली. अकोल्याबाहेर नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये भीमराव केराम, धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघातून वसंतराव सूर्यवंशी, असे आमदारही त्यांनी निवडून आणले; मात्र गेल्या काही वर्षांत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाला अपयशाचे थोडे डाग लागले आहेत. स्वत: अ‍ॅड. आंबेडकर हे १९९९ नंतर सलग तीनदा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या संपूर्ण काळात त्यांनी विविध राजकीय प्रयोग केले. कापसाच्या प्रश्नावर डाव्या आघाडीला सोबत घेऊन त्यांनी माकपचे तत्कालीन नेते प्रकाश करात यांच्यासह मेळावेसुद्धा घेतले. दरम्यानच्या काळात कधी लहान-मोठ्या संघटनांची मोट बांधली. २००९ मध्ये १४ पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘रिडालोस’चा ते हिस्सा झाले. परंपरागत मते अन् ओबीसींची सांगड घालत त्यांनी दोन वर्षांपूर्वी ओबीसींचा जागर सुरू केला. जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व हाती घेत निवडणुकीचा बिगुल फुंकला व काँग्रेसला १० जागांचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावासंदर्भात काँग्रेसची स्पष्ट भूमिका जाहीर होण्यापूर्वीच आता त्यांनी ‘एमआयएम’सोबत जाण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे त्यांनी नवा सारिपाट मांडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Ambedkar' tie knowt with ovaisi's 'MIM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.