आंबेडकरांच्या ‘वंचित’ प्रयोगाला ‘ब्रेक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 09:28 PM2019-09-11T21:28:04+5:302019-09-11T23:20:07+5:30
आंबेडकरांच्या ‘वंचित’ प्रयोगाला ‘ब्रेक’! लागला आहे.
Next
र ाजेश शेगोकार अकोला : सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाºया अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. भारिप, भारिप-बमसं, रिडालोस, अशा अनेक प्रयोगांनंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी ‘एमआयएम’ला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला. आता ‘वंचित’मधून ‘एमआयएम’ बाहेर पडल्यामुळे ‘वंचित’च्या प्रयोगाला मोठा ‘ब्रेक’ बसला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी ते कोणत्या नव्या भिडूसोबत सत्तेचा सारिपाट मांडतात, याकडे लक्ष लागले आहे. १९८० मध्ये अकोल्यात दाखल झालेल्या अॅड. आंबेडकरांनी राजकारणामध्ये ‘सामाजिक अभियांत्रिकी’च्या माध्यमातून सत्तेत जाण्याचा यशस्वी प्रयोग केला. प्रारंभी त्यांनी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षावर काम सुरू केले. १९८४ ची लोकसभा निवडणूक त्यांनी याच पक्षावर लढविली. त्यावेळी त्यांचा अवघ्या १३ हजार मतांनी पराभव झाला. पुढे काँग्रेससोबत त्यांनी आघाडी करून लोकसभा गाठली; मात्र लवकरच भारिपचा विस्तार करीत बहुजन महासंघाची जोड देत अकोला पॅटर्नची मुहूर्तमेढ रोवली. या भारिप बहुजन महासंघाने १९९० ते २००४ पर्यंत राज्यात समर्थ पर्याय उभा केला. त्यानंतर मात्र अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाला फारसे यश मिळाले नाही. स्वत: अॅड. आंबेडकर हे १९९९ नंतर सलग चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीत एकमेव आमदार निवडून आणता आला. दरम्यानच्या काळात त्यांनी विविध राजकीय प्रयोग केले. कापसाच्या प्रश्नावर डाव्या आघाडीला सोबत घेऊन त्यांनी माकपचे तत्कालीन नेते प्रकाश कारत यांच्यासह मेळावेसुुद्धा घेतले. कधी लहान-मोठ्या संघटनांची मोट बांधली तर कधी विविध समाजांसाठी जागर मेळावे घेऊन बहुजन मतपेढी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. २००९ मध्ये १४ पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘रिडालोस’चा ते हिस्सा झाले; मात्र २०१९ मध्ये धनगर, ओबीसी, मुस्लीम यांना एकत्र करीत वंचित बहुजन आघाडीला जन्म दिला. याद्वारे जातनिहाय उमेदवार जाहीर करून वंचित समाजाच्या अस्मितेवर फुंकर घातली. या फुंकरमुळेच राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघांत विजयाचे स्वप्न पाहणाºया काँग्रेस आघाडीच्या आशेची ज्योत विझली व ‘वंचित’ची ताकद विधानसभेत किती पडझड करेल, याची गणिते मांडली जाऊ लागली; मात्र याच दरम्यान ‘एमआयएम’ने त्यांची साथ सोडली. ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीच आघाडी संपल्याचे जाहीर केल्यानंतर आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने आता ते आणखी कोणता प्रयोग करतात, याकडे लक्ष लागले आहे.