आंबेकर टाेळीला हलविले, केदार अकाेल्यात, थोटांगे भंडाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:23 AM2021-08-21T04:23:52+5:302021-08-21T04:23:52+5:30

अकाेला : नागपुरात दहशत पसरविलेला कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदारसह टोळीतील पाच साथीदारांना ...

Ambekar moved to Tali, Kedar to Akalya, Thotange to Bhandara | आंबेकर टाेळीला हलविले, केदार अकाेल्यात, थोटांगे भंडाऱ्यात

आंबेकर टाेळीला हलविले, केदार अकाेल्यात, थोटांगे भंडाऱ्यात

googlenewsNext

अकाेला : नागपुरात दहशत पसरविलेला कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदारसह टोळीतील पाच साथीदारांना नागपूर कारागृहातूनही तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये अकाेल्याच्या कृष्णा थाेटांगेचा समावेश असून त्याला भंडारा कारागृहात तर नीलेश केदारला अकाेल्यात हलविण्यात आले आहे. काही दिवसांपासून कैद्यांमध्ये सुरू असलेल्या टोळीयुद्धामुळे आणि त्यातून होणाऱ्या मारहाणीमुळे कारागृह प्रशासनाने हे पाऊल उचलले

१२ ऑक्टोबर २०१९ रोजी आंबेकर टोळीविरुद्ध गुजरातच्या व्यापाऱ्याकडून हप्ता वसुली व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आंबेकर टोळीविरुद्ध अपहरण, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, फसवणूक, हप्ता वसुली, जमिनीचा ताबा घेण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. आंबेकर, त्याचा भाचा नीलेश केदार, सराफा व्यापारी राजा अरमरकर, गुजरातच्या तीन हवाला व्यावसायिकांसह एक डझनपेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली होती.

सध्या आंबेकरसह सहा आरोपी नागपूर कारागृहात आहेत. एकमेकांशी वाद करून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना संपविण्यासाठी आंबेकर ओळखला जातो. काही दिवसांपासून नागपूर कारागृहात कैद्यांमुळे मारहाणीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे या टाेळीला नागपूर कारागृहातून हलविण्यात आले आहे. त्याचा दबदबा होता. कारागृह प्रशासनाच्या कारवाईमुळे आंबेकर टोळीत खळबळ उडाली आहे.

आंबेकर टोळीने आपल्या गृह जिल्ह्याच्या जवळ असलेल्या कारागृहात जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मकोकाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी आंबेकर टोळीला दुसऱ्या कारागृहात हलविण्याची परवानगी दिली. या निर्णयावर बुधवारपासून कारागृह प्रशासनाने अंमलबजावणी करणे सुरू केले आहे. आंबेकरला नाशिक कारागृहात तर त्याचा भाचा नीलेश केदारला अकोला कारागृहात, नाशिकच्या रमेश लोणे पाटीलला अमरावती कारागृहात, मुंबईच्या जगन जगदानेला नागपूर कारागृहात तर अकोल्याच्या कृष्णा थोटांगेला भंडारा कारागृहात हलविण्यात आले आहे.

Web Title: Ambekar moved to Tali, Kedar to Akalya, Thotange to Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.