आंबोडा परिसराला वादळी पावसाचा तडाखा!
By admin | Published: June 7, 2017 01:12 AM2017-06-07T01:12:55+5:302017-06-07T01:12:55+5:30
आंबोडा : येथील परिसरात ५ जूनच्या सायंकाळी वादळी पावसासह विजेच्या कडकडाटासह पावसाने थैमान घातल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या केळीचे पीक भुईसपाट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबोडा : येथील परिसरात ५ जूनच्या सायंकाळी वादळी पावसासह विजेच्या कडकडाटासह पावसाने थैमान घातल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या केळीचे पीक भुईसपाट झाले आहे.
यामध्ये गजानन गिरी, प्रमोद अस्वार, अमोल सावरकर, रामा अस्वार, पुरुषोत्तम अस्वार आदी शेतकऱ्यांच्या केळीची झाडे बुडातून जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांनी पीक लागवडीकरिता बँकेकडून कर्ज घेतले असून, पिकाची लागवड केली. त्यातच कर्जबाजारी असल्याने हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याकडे महसूल विभागाला निवेदन देऊनही पिकाची पाहणी करण्याकरिता टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. याच घटनेत अनेक वृक्ष बुडातून पडली तर ५ जूनपासून विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा बंद असून, या गावातील पाणीपुरवठा बंद पडला आहे. ६ जून रोजी पटवारी गावात आले असूनसुद्धा त्यांनी पिकाची पाहणीसुद्धा केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे, तरी महसूल विभागाने नुकसानाचे सर्वेक्षण करून पिकाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी श्याम गिरी, प्रभुदास अस्वार, विजय देशमुख यांनी केली आहे.