रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:25 AM2021-02-26T04:25:30+5:302021-02-26T04:25:30+5:30
मारुती व्हॅनचे महानगरपालिका क्षेत्राचे रुग्णवाहिकांचे भाडेदर पाचशे रुपये प्रति एक फेरी (२५ कि.मी.पर्यंत), महानगरपालिका क्षेत्र सोडून एक हजार ...
मारुती व्हॅनचे महानगरपालिका क्षेत्राचे रुग्णवाहिकांचे भाडेदर पाचशे रुपये प्रति एक फेरी (२५ कि.मी.पर्यंत), महानगरपालिका क्षेत्र सोडून एक हजार रुपये व जिल्ह्याबाहेर प्रति कि.मी. ११ रुपये प्रमाणे. टाटा सुमो व मॅटेडोरचे महानगरपालिका क्षेत्राचे रुगणवाहिकांचे भाडेदर सहाशे रुपये प्रति एक फेरी (२५ कि.मी.पर्यंत), महानगरपालिका क्षेत्र सोडून एक हजार चारशे रुपये व जिल्ह्याबाहेर प्रति कि.मी. १२ रुपयेप्रमाणे. टाटा ४०७ व स्वराज माझदाचे महानगरपालिका क्षेत्राचे रुगणवाहिकांचे भाडेदर सातशे रुपये प्रति एक फेरी (२५ कि.मी.पर्यंत), महानगरपालिका क्षेत्र सोडून रु. एक हजार तीनशे व जिल्ह्याबाहेर प्रति कि.मी. १४ रुपयेप्रमाणे तर आय.सी.यू. अथवा वातानुकूलित वाहनात वातानुकूलित यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमूद दरात १५ टक्के वाढीव दराने राहणार आहेत. उच्च न्यायालयाने रुग्णवाहिकांचे भाडेदर ठरविण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार हे दर आकारले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी दिली आहे.
000000000