सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी मागीतली रक्कम; कनिष्ठ सहाय्यक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 03:59 PM2019-09-11T15:59:31+5:302019-09-11T15:59:37+5:30

परिचराच्या पत्नीने केलेल्या तक्रारीच्या चौकशीमध्ये सरोदे यांनी पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले होते.

The amount requested to pay retirement benefits; Junior Assistant Suspended | सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी मागीतली रक्कम; कनिष्ठ सहाय्यक निलंबित

सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी मागीतली रक्कम; कनिष्ठ सहाय्यक निलंबित

Next

अकोला : सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभागातील परिचराला पैशाची मागणी करणाऱ्या कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक शरद सरोदे यांना निलंबित केल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी दिला. परिचराच्या पत्नीने केलेल्या तक्रारीच्या चौकशीमध्ये सरोदे यांनी पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले होते.
परिचराची पत्नी उषा रमेश टोपले यांनी याप्रकरणाची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली होते. त्यामध्ये सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी कनिष्ठ सहाय्यक सरोदे यांनी पैशाची मागणी करणे, ती रक्कम स्वीकारली. ही बाब प्राथमिक चौकशीतच उघड झाली. तक्रारकर्ता आणि सरोदे यांची बयाणेही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे नोंदवण्यात आली. त्यामध्ये पैसे घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सरोदे यांना निलंबित करण्याचा आदेश दिला.

 

Web Title: The amount requested to pay retirement benefits; Junior Assistant Suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.