कृषिपंप व यंत्रमागधारकांना ३१,२१५.८४ कोटींचे अनुदान

By Admin | Published: August 17, 2015 01:23 AM2015-08-17T01:23:24+5:302015-08-17T01:23:24+5:30

कमी दरात कृषिपंप देण्याकरिता शासनाने निवडला सौरपंपाचा पर्याय.

An amount of Rs. 31,215.84 crores to farmers and laborers | कृषिपंप व यंत्रमागधारकांना ३१,२१५.८४ कोटींचे अनुदान

कृषिपंप व यंत्रमागधारकांना ३१,२१५.८४ कोटींचे अनुदान

googlenewsNext

अकोला : शेतात विद्युत पुरवठा देण्याकरिता खांब, तार व रोहित्रांचा कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागत असून, आतापर्यंत राज्य शासनाने कृषिपंप व यंत्रमागधारकांना ३१,२१५.८४ कोटींचे अनुदान दिले आहे. तसेच हा अवाढव्य खर्च टाळून शेतकर्‍यांना कमी दरात कृषिपंप देण्याकरिता शासनाने सौरपंपाचा पर्याय निवडला आहे. आतापर्यंत राज्यात ३१,२१५.८४ कोटींचे अनुदान दिल्यावरही २0११ पासून दीड लाखांपेक्षा जास्त कृषिपंपाचे अर्ज प्रलंबित आहेत. शेतकर्‍यांनी नियमानुसार पैसेही भरले आहेत. शेतकर्‍यांकडे पाण्याचीही व्यवस्था आहे. मात्र, राज्य शासनाकडील मुबलक निधीअभावी शेतकर्‍यांना कृषिपंप जोडण्या देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून, त्वरित कृषिपंप देण्याची मागणी जोर धरीत आहे. राज्यातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या मोठय़ा प्रमाणात आत्महत्या झाल्या आहेत. या भागात सिंचनाच्या सुविधेत वाढ व्हावी, यासाठी महावितरणतर्फे या भागात एकूण ७ हजार ५४0 सौरपंप देण्यात येणार आहे. या भागांशिवाय महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेला लाभार्थी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या जिल्हय़ातील गावातील शेतकरी, वनविभागाच्या नाहरकत प्रकारामुळे विद्युतीकरण न झालेल्या भागातील शेतकरी किंवा महावितरणकडे पैसे भरूनही ज्यांना तांत्रिक कारणांमुळे जवळच्या काळात वीज पुरवठा देणे शक्य झाले नाही, अशा शेतकर्‍यांनाही सौरपंप दिले जाणार आहे.

Web Title: An amount of Rs. 31,215.84 crores to farmers and laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.