अद्ययावत फर्निचरची रेंज अकोल्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:04 AM2017-10-06T02:04:06+5:302017-10-06T02:04:19+5:30
अकोला : पश्चिम विदर्भातील फर्निचर विक्रीचे मोठे केंद्र म्हणून अकोल्याची ओळख झाली आहे. सर्वसामान्य वर्गापासून तर उच्चभ्रू घरात लागणारे अद्ययावत े फर्निचर शहरातील शोरूम्समध्ये उपलब्ध आहेत. दिवाळीच्या निमित्ताने गृह सजावटीसह सोफासेटला अधिक मागणी दरवर्षी राहते, ती अद्ययावत नव्या रेंजचे सोफासेट शहरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पश्चिम विदर्भातील फर्निचर विक्रीचे मोठे केंद्र म्हणून अकोल्याची ओळख झाली आहे. सर्वसामान्य वर्गापासून तर उच्चभ्रू घरात लागणारे अद्ययावत े फर्निचर शहरातील शोरूम्समध्ये उपलब्ध आहेत. दिवाळीच्या निमित्ताने गृह सजावटीसह सोफासेटला अधिक मागणी दरवर्षी राहते, ती अद्ययावत नव्या रेंजचे सोफासेट शहरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कधीकाळी लाकडी फर्निचरला मागणी असायची; मात्र गेल्या काही वर्षांपासून कुशनच्या फर्निचरने ही जागा घेतली आहे. फर्निचरच्या आत जर सागवान असेल तर चालेल; मात्र वरून आकर्षक कुशन असावे, हे अलीकडचे चलन आहे. ग्राहकाच्या आवडी-निवडी आणि मागणीनुसार आता बाजारपेठ सजू लागली आहे. लाकडी सोफासेट स्वस्त आणि कुशनचे सोफासेट महाग असे चित्र बाजारातील आहे. सोफासेट, बेड, दिवान, कपाट, ड्रेसिंग टेबल, स्टडी-ऑफिस टेबल, कॉम्प्युटर टेबल, डायनिंग टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, बंगोई, कॉर्नर टेबल, टी-टेबल, स्टुल आदी अद्ययावत स्वरूपाचे फर्निचर बाजारपेठेत दाखल आहे.
सर्वसामान्य अजूनही लोखंडी कपाटच घेतात..
घरातील आंतरसजावटीनुसार जागेवर फर्निचर करण्याची प्रथा वाढत असली, तरी सर्वसामान्य ग्राहक अजूनही लोखंडी कपाटच खरेदी करताना दिसतो. दरवर्षी हजारो कपाट विकल्या जात असून, अजूनही अकोल्यात ही बाजारपेठ मोठी आहे. आठ हजारांपासून तर पंधरा हजारांपर्यंतचे कपाट बाजारात विक्रीसाठी आहे.
पीएलबीच्या फर्निचरकडे कल..
दिसायला गुळगुळीत, चकाकी असल्याने अलीकडे ग्राहकांचा कल स्वस्त आणि आकर्षक दिसणार्या पीएलबी फर्निचरकडे झुकलेला आहे. पीएलबी फर्निचर टिकाऊ नसले, तरी ते सुंदर आणि सुबक असल्याने ग्राहकाच्या पसंतीस उतरते. ऊस आणि लाकडाच्या भुसा-चुरीवर रासायनिक प्रक्रिया करून पीएलबी फर्निचरची निर्मिती केली जाते. अलीकडे या फर्निचरला मागणी वाढली आहे.
नामांकित फर्निचरचे शोरूम्स
४फर्निचरची मोठी रेंज शहरात असून, नामांकित मोठय़ा शोरूम्ससह लहान-मोठय़ा फर्निचर दुकानांची संख्या २५ च्या घरात आहे. पश्चिम विदर्भातील मोठे फर्निचर विक्री केंद्र म्हणून पुढे आलेल्या अकोल्यातील नामांकित शोरूम्समध्ये नेक्सेस स्टोअर, तुलशान, एम.आर. फर्निचर, रौनक सेल्स, आहुजा, निधी, फोम हाउस, पेशव्यांचे फर्निचर, धनलक्ष्मी, स्वस्तिक, श्रीसाई, छाया, नीलेश यांचे नाव घेतले जाते.
४सोफासेट १३ हजारांपासून ६0 हजारांपर्यंत आहेत. कॉर्नर सोफाच्या किमती त्याहून अधिक आहेत. पीएलबी मटेरियलच्या कपाटांची रेंज आठ हजारांपासून १८ हजारांपर्यंत आहे. एलडी टीव्ही सेटचे फर्निचर साडेचार हजारांपासून साडेसहा हजारांपर्यंत आहेत. बेडच्या किमती १९ हजारांपासून ४0 हजारांपर्यंत आहेत. डायनिंग टेबल चार हजारांपासून, तर २५ हजारांपर्यंत आहेत. ड्रेसिंग टेबल १७ हजारांपासून तर ७0 हजारांपर्यंत आहेत. टी-टेबल अठराशे रुपयांपासून तर २0 हजारांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.
दिवाळीच्या निमित्ताने नवीन रेंजच्या सोफासेट आणि डायनिंगला मागणी असते. मागणी तसा पुरवठा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. दिवाळीच्या निमित्ताने तेजी येत असून, ग्राहकांची गर्दी दरवर्षीप्रमाणे होईल, ही अपेक्षा आहे.
-अशोक आहुजा,
संचालक, ग्लोबल फर्निचर अकोला