अमरावती, बीडची भेसळयुक्त ढेप बाजारात

By admin | Published: March 20, 2017 02:45 AM2017-03-20T02:45:22+5:302017-03-20T02:45:22+5:30

अकोल्यातील ढेप उद्योजक त्रस्त; भेसळीमुळे पशूंच्या जीवितास धोका.

Amravati, Beed's adulterated market | अमरावती, बीडची भेसळयुक्त ढेप बाजारात

अमरावती, बीडची भेसळयुक्त ढेप बाजारात

Next

संजय खांडेकर
अकोला, दि. १९- अमरावती आणि बीडची भेसळयुक्त ढेप गत काही महिन्यांपासून अकोल्याच्या बाजारपेठेत आली असून, त्याचा जबर फटका पशुपालक आणि पशूंच्या जीविताला सोसावा लागत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
अकोल्यातील सरकी ढेपला देशभरात मोठी मागणी आहे. अकोल्यातील ढेप मध्य प्रदेशापासून, राजस्थानसह विविध राज्यांत पोहोचते. ढेपची मागणी सातत्याने वाढल्याने सरकीला २२00 ते २२५0 रुपये क्विंटलपर्यंत भाव आहे.मात्र अमरावती आणि बीडच्या ढेप उद्योजकांनी २0३0 ते २१00 पर्यंतच्या भावात मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेत सरकी आणली. मराठवाडा, विदर्भातच नव्हे, तर देशभरात ही सरकी पोहोचली आहे. कापसाचे आणि ढेप तयार करणार्‍या इतर पिकांचे भाव गडगडले नसताना ढेप स्वस्त कशी, या विचारात अकोल्यातील उद्योजक पडले त्यामुळे या मागच्या कारणाचा शोध घेतला असता, अमरावती आणि बीडने देशभरातील बाजारपेठ खिळखिळी केल्याचे समोर आले. तांदळाची साल, कॉफी आणि पामचा चुरा, मक्याचा चुरा ढेपमध्ये भेसळ करून स्वस्त दरात ढेप बाजारात आणली जात असल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे, त्यामुळे ढेपचे भाव घसरले आहे. एकीकडे ढेपचे भाव वाढल्याने पशुपालक त्रासलेला असताना स्वस्त दरात मिळणारी भेसळयुक्त ढेप तो विकत घेऊन ढोरांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी याची तातडीने गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे. काही उद्योजकांवर याप्रकरणी ठोस कारवाई झाल्यास मोठे घबाड उजेडात येऊ शकते.

अकोल्यात उरले केवळ १५ उद्योग
अकोला औद्योगिक वसाहतीत ढेप निर्मितीचे ४५ उद्योग होते; मात्र गेल्या काही महिन्यांपासून बनावट ढेपमुळे अचानक ढेपेची मागणी घटली. त्यामुळे अकोल्यातील २0 उद्योजकांनी सरकी आणि इतर ढेपची निर्मितीच तात्पुरती थांबविली आहे. अकोल्यात केवळ १५ उद्योजक ढेपची निर्मिती करीत आहेत. या तुलनेत अमरावतीत २0 आणि आणि बीडमध्ये ५0 कारखाने सुरू आहेत.
आरोग्य, दुधावर परिणाम
भेसळयुक्त ढेप खाल्याने पशूंचे लिव्हर तर खराब होत आहेच, सोबतच दुधाळ जनावरांच्या दुधावरही याचा परिणाम होतो. तांदुळाच्या धानाचा चुरा आणि मक्याचे वेस्टेज किती प्रमाणात ढेपमध्ये भेसळ करावे, याचे प्रमाण असते, ते चुकले की परिणाम होतो, अशी माहितीदेखील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली आहे.

Web Title: Amravati, Beed's adulterated market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.