अमरावती विभागात ३२३ रूग्णांना डेंग्यूसदृश तापाचा विळखा
By admin | Published: November 9, 2014 11:36 PM2014-11-09T23:36:23+5:302014-11-09T23:36:23+5:30
बुलडाणा जिल्ह्यात ६, अकोला ९0 तर यवतमाळमध्ये सर्वाधिक १५८ रुग्णांचा समावेश.
खामगाव (बुलडाणा): गत दोन महिन्यात अमरावती विभागात ३२३ पेक्षा जास्त रुग्णांना डेंग्यूसदृश आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने या नागरिकांमध्ये भीतीचे वा तावरण निर्माण झाले आहे. राज्यात या आजारामुळे आतापर्यंत ३३ व्यक्तींना जीव गमवावे लागले आहेत.
डेंग्यूची लागण एडिस इजिप्टाय डासांमुळे होते. या डासांची उत्पत्ती साठवलेल्या पाण्यात, तसेच डबक्यांमध्ये होते. गेल्या दोन महिन्यापासून या आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती विभागात आ तापर्यंत ३२३ रुग्णांना डेंग्यूसदृश्य ताप असल्याचे निष्पन्न झाले आहे. यात बुलडाणा जिल्ह्यात ६, अकोला ९0, वाशिम 0८, अमरावती ६१, तर यव तमाळमध्ये सर्वाधिक १५८ रुग्णांचा समावेश आहे. या आजारामुळे राज्यात यावर्षी ३३ रुग्णांना जीव गमवावे लागले. आरोग्य विभाग मात्र याबाबत सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
या आजारामुळे रुग्णांच्या शरीरातील पांढर्या रक्तपेशींची संख्या झपाट्याने कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांना रक्ताचे विलगीकरण करुन त्यातील आवश्यक घटक द्यावे लागतात. हा खर्च मोठय़ा प्रमाणात असतो. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हे उपचार घेणे कठीण होते.
देशभरात सर्वत्र ह्यस्वच्छ भारतह्ण अभियान राबविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे; मात्र हे अभियान प्रभावीपणे राबविले जात नसल्याचे दिसून येते. या अभियानाच्या काळातच अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती वाढून, पसरत असलेली डेंग्यूची साथ चिंतेचा विषय ठरत आहे. प्रशासनाने स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवून, त्यात जनतेचा सहभाग कसा वाढेल, यादृष्टीने प्रय त्न करणे गरजेचे आहे.
डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांची जिल्हानिहाय संख्या
बुलडाणा - ६
अकोला - ९0
वाशिम - 0८
अमरावती - ६१
यवतमाळ - १५८