अमरावती-मुंबई एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवारी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 11:07 AM2022-02-02T11:07:07+5:302022-02-03T17:17:43+5:30

Amravati-Mumbai Express canceled : ७२ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने अप व डाऊन मार्गावरील १० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Amravati-Mumbai Express canceled on Friday, Saturday | अमरावती-मुंबई एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवारी रद्द

अमरावती-मुंबई एक्स्प्रेस शुक्रवार, शनिवारी रद्द

googlenewsNext

अकोला : मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाअंतर्गत ठाणे व दिवा दरम्यान नवीन रेल्वे लाइन टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने शनिवार, ५ फेब्रुवारी ते सोमवार ७ फेब्रुवारी दरम्यान ७२ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने अप व डाऊन मार्गावरील १० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अमरावती-मुंबई एक्स्प्रेस व नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसचा समावेश असल्याने अकोलेकरांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या लाईनचे काम सुरु आहे. त्यामुळे शुक्रवार व शनिवारी अमरावती येथून सुटणारी १२११२ अमरावती-मुंबई मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच मुंबई येथून सुटणारी १२१११ मुंबई-अमरावती मेल एक्स्प्रेस शनिवार व रविवारी रद्द करण्यात आली आहे.

सेवाग्राम एक्स्प्रेसही रद्द

नागपूर ते मुंबई दरम्यान धावणारी १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस शुक्रवार व शनिवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस शनिवार व रविवारी रद्द करण्यात आली आहे. दोन दिवस या गाड्या धावणार नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Web Title: Amravati-Mumbai Express canceled on Friday, Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.