उद्यापासून दररोज धावणार अमरावती-मुंबई एक्स्प्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:13 AM2021-06-30T04:13:15+5:302021-06-30T04:13:15+5:30
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ प्रबंधक कार्यालयाच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०२११२ अमरावती -मुंबई विशेष (दैनिक) ही गाडी एक ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ प्रबंधक कार्यालयाच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०२११२ अमरावती -मुंबई विशेष (दैनिक) ही गाडी एक जुलैपासून, तर ०२१११ मुंबई अमरावती विशेष (दैनिक) ही गाडी २ जुलैपासून पूर्ववत धावणार आहे.
याशिवाय ०११३७ नागपूर-अहमदाबाद व ०११३८ अहमदबाद-नागपूर या गाड्या अनुक्रमे सात व आठ जुलैपासून सुरू होणार आहेत. ०१४०३ नागपूर-कोल्हापूर विशेष (मंगळवार, शनिवार) व ०१४०४ कोल्हापूर-नागपूर विशेष (सोमवार, शुक्रवार) या गाड्या अनुक्रमे ३ व २ जुलैपासून धावणार आहेत.
०२०३५ पुणे -नागपूर विशेष व ०२०३६ नागपूर -पुणे विशेष या गाड्या अनुक्रमे ३ व ४ जुलैपासून सुरू होणार आहेत. ०२११३ पुणे-नागपूर विशेष आणि ०२११४ नागपूर -पुणे विशेष या गाड्या अनुक्रमे ४ व ३ जुलैपासून पूर्ववत होणार आहेत. ०२११७ पुणे-अमरावती AC विशेष (बुधवार) आणि ०२११८ अमरावती-पुणे AC विशेष (गुरुवार) या गाड्या अनुक्रमे ७ व ८ जुलैपासून पुन्हा धावणार आहेत.
०२२२३ पुणे -अजनी विशेष (शुक्रवार) आणि ०२२२३ अजनी -पुणे विशेष (मंगळवार) या गाड्या अनुक्रमे १० व ६ जुलैपासून पूर्ववत होणार आहेत. ०२०२४१ पुणे-नागपूर स्पेशल (गुरुवार) आणि ०२०२४२ नागपूर -पुणे (शुक्रवार) या गाड्या अनुक्रमे १ व २ जुलैपासून पुन्हा धावणार आहेत. ०२२३९ पुणे -अजनी विशेष (शनिवार) व ०२२४० अजनी -पुणे विशेष (रविवार) या गाड्या अनुक्रमे १ व २ जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहेत.
हावडा-मुंबई साप्ताहिक विशेष शुक्रवारपासून
हावडा येथून अकोला मार्गे मुंबईला जाणाऱ्या गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ०२४७० हावडा-मुंबई ही विशेष गाडी २ जुलैपासून आठवड्यातून एकदा दर शुक्रवारी हावडा येथून दुपारी २.३५ वाजता प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी मुंबई येथे रात्री ११ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर शनिवारी दुपारी १२.३५ वाजता येणार आहे. ०२४६९ ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई येथून ४ जुलैपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर रविवारी सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि हावडा येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी १९.३० वाजता पोहोचेल. ही गाडी दर रविवारी रात्री आठ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.