अमरावती-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस तीन महिने उधनापर्यंतच धावणार

By Atul.jaiswal | Published: June 10, 2024 03:43 PM2024-06-10T15:43:36+5:302024-06-10T15:44:24+5:30

९० दिवसांच्या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक ४ प्रवासी वाहतुकीसाठी बंद राहणार

Amravati-Surat Superfast Express will run only till Udhna for three months | अमरावती-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस तीन महिने उधनापर्यंतच धावणार

अमरावती-सुरत सुपरफास्ट एक्स्प्रेस तीन महिने उधनापर्यंतच धावणार

अतुल जयस्वाल, अकोला: गुजरात राज्यातील सुरत रेल्वेस्थानकाचा पहिल्या टप्प्यातील पुनर्विकास १० जून ते ७ सप्टेंबर या कालावधीत केला जाणार आहे. या ९० दिवसांच्या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक ४ प्रवासी वाहतुकीसाठी बंद राहणार असल्यामुळे अमरावती-सुरत एक्स्प्रेस उधनापर्यंत धावणार आहे.

या कालावधीत अनेक गाड्या प्रभावित होणार आहेत. यामध्ये ८ गाड्या सुरत स्थानक ऐवजी उधना स्थानकावरून प्रस्थान करतील, तर ९ गाड्या सुरत स्थानक ऐवजी उधना स्थानकापर्यंत धावतील. या कालावधीत अकोला मार्ग धावणारी २०९२५ अमरावती- सुरत एक्स्प्रेस १० जून ते ७ सप्टेंबर या कालावधीत उधना स्थानकापर्यंत धावेल. तर २०९२६ सुरत-अमरावती एक्स्प्रेस उधना स्थानकावरून रवाना होणार आहे.

Web Title: Amravati-Surat Superfast Express will run only till Udhna for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.