अमरावती विद्यापीठ युवा महोत्सवाचा दिमाखदार समारोप
By admin | Published: September 21, 2014 11:00 PM2014-09-21T23:00:04+5:302014-09-22T01:25:20+5:30
शेवटच्या दिवशी फोक ऑर्केस्ट्रा, वेस्टर्न ग्रुपची धूम
अकोला - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला येथे गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या रंगारंग युवा महोत्सवाचा रविवारी सायंकाळी दिमाखदार समारोप झाला. स्व. डॅडी देशमुख खुल्या रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाच्या अंतिम दिवशी अमरावती विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फोक ऑर्केस्ट्रा, वेस्टर्न ग्रुप व वेस्टर्न सोलो या कार्यक्रमांची धूम होती.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. जयकिरण ितडके होते. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव व्ही. जी. भांबुरकर, शिवाजी शिक्षण संस्थेचे उ पाध्यक्ष महादेवराव भुईभार, प्राचार्य डॉ. नानासाहेब भडांगे, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, डॉ. व्ही. एस. जामोदे, प्रा. एम. टी. देशमुख, डॉ. श्रीकांत पाटील, किशोर देशमुख, सुदर्शन देशमुख, डॉ. भोजराज चौधरी,निखिलेश नलवडे, महेश पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्र. कुलगुरू जयकिरण ितडके यांनी युवा महोत्सवाचे महत्त्व सांगितले. युवा महोत्सवामध्ये विद्यार्थी घडत असून, त्यांना जीवन जगण्याची खरी कला या महोत्सवाच्या माध्यमातून मिळत असल्याचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रतीक्षा कोकाटे यांनी केले. युवा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला अमरावती विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती हो ती.