क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशाकरिता खेळनिहाय चाचणी अमरावतीला
By admin | Published: July 2, 2017 09:26 AM2017-07-02T09:26:07+5:302017-07-02T09:26:07+5:30
राज्यातील ११ क्रीडाप्रबोधिनीत थेट प्रवेशाकरिता खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत राज्यातील ११ क्रीडाप्रबोधिनीत सन २०१७-१८ या वर्षाकरिता थेट प्रवेशाकरिता खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती विभागातील खेळाडूंकरिता अमरावती येथे कौशल्य चाचणीचे आयोजन ७ व ८ जुलै रोजी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड येथे सकाळी ८ वाजता केले आहे.
अॅथलेटिक्स, ज्युदो, शुटिंग, आर्चरी, हॅण्डबॉल या खेळाचे खेळाडू चाचणी देऊ शकतात. खेळाडू हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तसेच राज्यस्तर स्पर्धेत सहभागी झालेला असावा. खेळाडूचे वय १९ वर्षाखालील असावे, असे खेळाडू चाचणी देण्यास पात्र ठरतील. खेळाडूंची फक्त निवासाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. खेळाडूंसोबत येणारे पालक व क्रीडा मार्गदर्शकांची निवास व्यवस्था करण्यात येणार नाही. तसेच खेळाडूंना प्रवास व भोजन खर्च स्वत: करावा लागणार आहे. पात्र खेळाडूंनी आवश्यक प्रमाणपत्रांसह चाचणीस्थळी उपस्थित राहावे, अशी माहिती प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली.