आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कारांचे थाटात वितरण!
By admin | Published: March 23, 2017 02:41 AM2017-03-23T02:41:29+5:302017-03-23T02:41:29+5:30
ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय या श्रेणीतील प्रथम पुरस्कार अकोट ग्रामीण रुग्णालयास प्रदान करण्यात आला.
अकोला, दि. २२- आरोग्य विभागातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, सवरेत्कृष्ट आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुरस्कार आणि कायाकल्प पुरस्कारांचे वितरण बुधवारी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. येथील एका खासगी हॉटेलमध्ये पार पडलेल्या सोहळय़ात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरखा अमानउल्ला खा, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण विधळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार दिले जातात. यामध्ये यावर्षी ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय या श्रेणीतील प्रथम पुरस्कार अकोट ग्रामीण रुग्णालयास प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम पुरस्कार हातरुण येथील प्रा. आ. केंद्र (२५ हजार रुपये), द्वितीय पुरस्कार धाबा प्रा. आ. केंद्र (१५ हजार रुपये) व तृतीय पुरस्कार कापशी प्रा. आ. केंद्र (१0 हजार रुपये) प्रदान करण्यात आला. उपकेंद्र श्रेणीत उमरा (१५ हजार रुपये), चरणगाव (१0 हजार रुपये), मोरगाव सादिजन (५ हजार रुपये) या उपकेंद्रांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. संचालन स्मीता जोशी व सचिन उनवणे, तर आभार प्रकाश गवळी यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशांत ठाकरे, डॉ. उत्पला देशभ्रतार, संजय सावळे, संदीप देशमुख, सचिन डांगे, भूषण सरोदे, नीलेश भिरड, राजू डहाणे, श्वेता मांडवडे यांनी परिश्रम घेतले. कायाकल्प पुरस्कार प्रदान या कार्यक्रमात कायाकल्प पुरस्कार प्रदान करण्यात आले. हातरूण प्रा. आ. केंद्रास जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार (दोन लाख रुपये), तर आगर व मळसूर येथील प्रा. आ. केंद्रांना प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून प्रत्येकी ५0 हजार रुपये देण्यात आले. जिल्हा स्त्री रुग्णालयाने विभागात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. खासगी डॉक्टरांचा सत्कार प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत दर महिन्याला प्रा. आ. केंद्र स्तरावर शिबिर घेतले जातात. यामध्ये विनामूल्य सेवा देणार्या वैद्यकीय क्षेत्रातील १८ खासगी डॉक्टरांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.