आनंदाचे डोही आनंद तरंग..!

By Admin | Published: June 25, 2017 08:14 AM2017-06-25T08:14:13+5:302017-06-25T08:14:13+5:30

आयुष्यात परिस्थिती कितीही बिकट असली, तरी मार्ग हा निघतोच आणि आनंद हा मिळतोच. हाच संदेश ‘आनंदाचे डोह’ या नाट्य प्रयोगातून अकोलेकरांनी घेतला.

Anand's dohi joy wave ..! | आनंदाचे डोही आनंद तरंग..!

आनंदाचे डोही आनंद तरंग..!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विठ्ठल..पांडुरंग अर्थात तुकोबाचा सखा सवंगडी. भक्तीचे साधन आणि संपूर्ण सर्मपण असेल, तर तो पांडुरंग गवसतो अन् तो एकदा का मिळाला, की संपूर्ण आयुष्य अपार अशा परमानंदाने व्यापून जाते. आयुष्यात परिस्थिती कितीही बिकट असली, तरी मार्ग हा निघतोच आणि आनंद हा मिळतोच. हाच संदेश "आनंदाचे डोह" या नाट्य प्रयोगातून अकोलेकरांनी घेतला.
प्रमिलाताई ओक सभागृहात शनिवारी सिनेअभिनेता तथा नाट्य कलावंत योगेश सोमण (पुणे) यांनी ह्यआनंदाचे डोहह्णचा २३९ वा प्रयोग सादर केला. रसिकाश्रय व सीताबाई कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ह्यहे बेटं राहूनच गेलंह्ण या युवती व महिलांकरिता नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाप्रसंगी ह्यआनंदाचे डोहह्ण हा एकपात्री प्रयोग सोमण यांनी केला.
अंत:करणात भगवंताचे नाम घंटेतल्या नादासारखे जेव्हा निनादू लागते, तेव्हाच आत्मानंद म्हणजे काय, हे कळते. आनंदाची परमोच्च अवस्था अनुभवयाची असेल, तर अखंड नामस्मरणात बुडून जायला हवे. तुकाराम महाराज हा अपूर्व आनंद अनुभवत होते. तो अपूर्व अनुभव प्रगट करताना श्रीविठ्ठलाला सांगतात, की आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाचि अंग आनंदाचे। याचाच अर्थ, ह्यह्यमी स्वत:च ब्रम्हानंदाने गच्च भरलेला डोह झाल्यामुळे माझ्या सर्वांगातून आनंदाच्या लाटा उसळून येत आहेत. माझे सर्वांग हाच आनंदाचा मूळ गाभा आहे.ह्णह्ण विठ्ठला, तुझ्या गोड नामात मी पूर्णपणे विरघळून गेल्याने हा ब्रम्हानंद मी प्रत्यक्षपणे अनुभवत आहे. तुकोबा परमात्माच्या भेटीसाठी किती व्याकूळ झालेले आहेत, हे नाट्य प्रयोगातून सोमण यांनी उत्तमपणे साकारले. त्या परमात्माच्या साक्षात्काराने संत तुकाराम महाराज यांचे संपूर्ण आयुष्य कसे उजळून निघाले, हे नाट्यातून मांडले. तुकोबांच्या भक्तीमुळे वैतागलेली त्यांची पत्नी आवलीचे पात्रही सक्षमपणे सोमण यांनी उभे केले.
कार्यक्रमाला अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष रमाकांत खेतान, रसिकाश्रयचे अध्यक्ष राम जाधव, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. एकपात्री प्रयोगानंतर नाट्य शिबिरातील शिबिरार्थींनी महाराष्ट्राची लोकधारा, लोकनृत्य, आदिवासी नृत्यासह ह्यरेल्वे स्टेशन, आकाशवाणी, रेडिओ सिटी, वाढदिवस हे प्रासंगिक नाट्य सादर केले, तसेच लावणी आणि शिवाजी महाराजांवरील पोवाडा भाव खाऊन गेले. ह्यभरतकुल भाग्यम्ह्ण यावर अभिनव कथ्थक नृत्य मंदिराच्या विद्यार्थिनींनी नृत्य केले. कार्यक्रमाचे संचालन शुभदा देव यांनी केले. आभार अभिजित परांजपे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Anand's dohi joy wave ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.