४१ अंश सेल्सीयस तापमानात रस्यावरील खड्ड्यात आंदाेलन

By राजेश शेगोकार | Published: April 17, 2023 04:48 PM2023-04-17T16:48:17+5:302023-04-17T16:48:27+5:30

जठारपेठ भागातील हेडगेवार रक्तपेढी समोरील खड्ड्यात बसून त्यांनी आपल्या आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. 

Andalan in a pit on the juice at a temperature of 41 degrees Celsius | ४१ अंश सेल्सीयस तापमानात रस्यावरील खड्ड्यात आंदाेलन

४१ अंश सेल्सीयस तापमानात रस्यावरील खड्ड्यात आंदाेलन

googlenewsNext

अकाेला - अकाेला शहरातील जठारपेठ, न्यु तापडीया नगर मुख्य रस्ता, केला प्लॉट, जठारपेठ, उमरीतील काही रस्त्यांचे खड्डे त्वरीत बुजविण्यासाठी  वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते निलेश देव यांनी अकाेल्यातील ४१ अंश सेल्सीअस तापमानात भर दूपारी आंदाेलन सुरू केले आहे. जठारपेठ भागातील हेडगेवार रक्तपेढी समोरील खड्ड्यात बसून त्यांनी आपल्या आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. 

 बिर्ला गेट ते न्यू तापडीया नगर पर्यंतचा पुर्ण रस्ता त्वरीत करावा त्याच बरोबर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे हे तातडीने बुजविण्यासाठी कार्यवाही करावी जाे पर्यंत  प्रशासन या कामांबाबत  ठोस आश्वासन देत काम सुरु करणार नाही तो पर्यंत खड्ड्यात बसून राहणार असल्याचे निलेश देव यांनी स्पष्ट केले. जठारपेठ, न्यु तापडीया नगर मुख्य रस्ता, केला प्लॉट, जठारपेठ, उमरीतील काही रस्त्यांचे खड्डे बुजविण्यासाठी महापालीकेला वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल घेतली नाही  त्यामुळेच आंदाेलन करण्याची वेळ आली असे देव यांनी सांगीतले.

Web Title: Andalan in a pit on the juice at a temperature of 41 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.